कोलकाता। भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील ३ सामन्यांची टी२० मालिका रविवारी (२१ नोव्हेंबर) संपली. या मालिकेतील तिन्ही सामन्यात भारताने मोठ्या फरकाने विजय मिळवत न्यूझीलंडला व्हाईटवॉश दिला. पण, असे असले तरी एका गोष्टीमुळे भारतीय संघव्यवस्थापनावर टीका होत आहे. ती गोष्ट म्हणजे युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडला या मालिकेतील एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही.
भारताने या टी२० मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवल्यानंतर विजयी आघाडी घेतली होती. त्यामुळे रविवारी झालेल्या तिसऱ्या टी२० सामन्यासाठी भारतीय संघात ऋतुराजला केएल राहुलऐवजी संधी मिळेल अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र, भारतीय संघव्यवस्थापननाने केएल राहुलला विश्रांती देताना इशान किशनला संघात संधी दिली. त्यामुळे अनेकांनी ऋतुराज गायकवाडवर अन्याय झाल्याचे म्हटले.
खरंतर, ऋतुराज गायकवाड गेल्या काही महिन्यांपासून तुफान फॉर्ममध्ये फलंदाजी करत आहे. त्याने गेल्याच महिन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळताना इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामात सर्वाधिक धावा करत ऑरेंज कॅप पटकावली होती. तसेच त्यानंतर झालेल्या सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफीमध्ये देखील त्याची बॅट महाराष्ट्राचे नेतृत्त्व करताना तळपली होती. त्याने ५ सामन्यांत ५१.८० च्या सरासरीने ३ अर्धशतकांसह २५९ धावा केल्या होत्या.
असे असतानाही ऋतुराजला न्यूझीलंडविरुद्ध संधी दिली गेली नसल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. तिसऱ्या टी२० सामन्यावेळी ऋतुराज सोशल मीडियावर ट्रेंड करत होता. तसेच काही चांहत्यांनी मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंना प्राधान्य दिल्याची टीकाही केली आहे.
One honest disappointment in this #INDvNZ series is how they treated #RuturajGaikwad.. the guy who won the Orange cap in #IPL and went guns blazing in SMAT, yet got benched. Totally unfair. #INDvsNZ #TeamIndia
— Sharon Solomon (@BSharan_6) November 21, 2021
@Ruutu1331 You Deserve Spot in Playing X1 Man 🥺
Paltan's Politics 🙂#RuturajGaikwad #Ruturaj pic.twitter.com/1ke9NRfQ3e— RDR N🅰️VEEN (@RdrNaveen) November 21, 2021
@ImRo45 rested KL Rahul ( who was consistent ) and include I.Kishan ,why not rest Surya kumar and include #RuturajGaikwad .Really disappointed with #RuturajGaikwad #MumbaiIndians #NZvsIND #TeamIndia https://t.co/x4VW6h5TQn
— PRB (@PrabhanjanSrin1) November 21, 2021
#RuturajGaikwad why not included for india A team for south africa tour ????highest scorer orange cap player for Ipl 2021 Seating on bench whyyyyyyy???
@BCCI @SGanguly99 @JayShah @ImRo45— $@nk€T (@Being_Sanky) November 21, 2021
If player like #RuturajGaikwad want include in playing 11 Better to apply for "Mumbai Quota" , as the application for Mumbai quota will be available from December #INDVsNZT20 #MumbaiIndians #TeamIndia
— PRB (@PrabhanjanSrin1) November 21, 2021
they won't give #RuturajGaikwad a chance cuz if he gets one, he'll give them no chance be to drop him#IndiaVsNewZealand #NZvIND #INDvsNZ
— ravi (@bryptotrader) November 21, 2021
https://twitter.com/JAYXXVIII/status/1462445024897949700
Rutu ko bench karne se accha mustak Ali trophy hi khelne dete kam se kam ek 100 to sure marta #RuturajGaikwad
— Gaurav (@gauravPatward18) November 21, 2021
https://twitter.com/SujyotAnil/status/1462439967586619395
https://twitter.com/Punakutty2004/status/1462431587782385668
दरम्यान, तिसऱ्या टी२० सामन्यांत भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ बाद १८४ धावा केल्या होत्या. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने अर्धशतकी खेळी करताना ५६ धावा केल्या. तसेच इशान किशनने २९ धावा केल्या, तर श्रेयस अय्यरने २५ आणि वेंकटेश अय्यरने २० धावांचे योगदान दिले. याशिवाय अखेरीस दीपक चाहरने तुफानी फटकेबाजी करताना ८ चेंडूत नाबाद २१ धावा केल्या. न्यूझीलंडकडून प्रभारी कर्णधार मिशेल सँटेनरने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
भारताने दिलेल्या १८५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघ १७.२ षटकांत १११ धावांवर सर्वबाद झाला. न्यूझीलंडकडून केवळ सलामीवीर मार्टिन गप्टीलने एकाकी झुंज दिली. त्याने ४ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ३६ चेंडूत ५१ धावा केल्या. अन्य कोणत्याही फलंदाजाला २० धावांचा टप्पाही ओलांडता आला नाही. भारताकडून अक्षर पटेलने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
न्यूझीलंडविरुद्ध टी२० मालिका जिंकल्यानंतरही रोहित शर्माला ‘या’ गोष्टीची सतावतेय चिंता
‘आमचे पाय जमिनीवरच राहू देऊ’, न्यूझीलंडविरुद्ध विजयानंतर राहुल द्रविड यांची मार्मिक प्रतिक्रिया