ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली भारतात परतला आहे. विराटची पत्नी अनुष्का शर्मा ही जानेवारीमध्ये आई बनणार आहे. त्यामुळे पालकत्त्व रजा घेत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर विराटने मायदेशात पतरण्याचा घेतला होता. यासाठी बीसीसीआयने विराटला परवानगीही दिली होती. मात्र, माजी भारतीय क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी विराटच्या पालकत्त्व रजेच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले आहेत. भारतीय संघात वेगवेगळ्या खेळाडूंसाठी वेगवेगळे नियम असल्याची टीका त्यांनी केली आहे. यानंतर चाहते गावसकरांवर चांगलेच भडकले आहेत.
एका चाहत्याने गावसकरांवर टीका केली की, “विराटने क्रिकेटजगतात सचिन तेंडुलकरच्या बरोबरीचे योगदान दिले आहे. तो संघाचा कर्णधार असल्यामुळे त्याची आपोआप प्रत्येक मालिकेसाठी निवड होते. अर्थात त्याला प्रत्येक सामना खेळावाच लागतो. सचिनने कित्येक आंतरराष्ट्रीय मालिकेतून माघार घेतली होती. त्यावेळी तुमच्यात सचिनवर प्रश्न उपस्थित करण्याची हिम्मत नव्हती का?”
https://twitter.com/perfect_indian/status/1341951540513292292?s=20
तसेच एका चाहत्याने म्हटले की, “तुम्ही असे कसे बोलू शकता. रोहित त्याच्या मुलाच्या जन्मावेळी घरी परत आला होता. याची त्यांना जाणीव झाली नाही का. तुम्हाला सतत विराटला निशाण्यावर धरण्याची सवय लागली आहे.”
What rubbish does Sunil Gavaskar speak…doesn't he realise, Rohit Sharma had also come home for birth of his child…always targeting kohli unnecessarily
— Jason (@jdnats) December 24, 2020
https://twitter.com/PalakParashar5/status/1341924378213142528?s=20
Disagree with Gavaskar.
No one is forcing Natarajan to bowl in the nets. He realizes it's a stepping stone for him.
Kohli deciding to go back is a personal choice. Cricket is his profession, a part of life, not his entire life. If that renders him unfit to play, sure, fire him. https://t.co/cr1QUw3kGc
— Kartikeya Tanna (@KartikeyaTanna) December 24, 2020
गावसकरांनी संघ व्यवस्थापनावर केली होती टीका
भारतीय संघाच्या संघ व्यवस्थापनावर भेदभावाचे आरोप लावत गावसकरांनी फिरकीपटू आर अश्विन आणि टी नटराजन यांचे उदाहरण दिले होते. एका इंग्रजी वेबसाईटच्या कॉलममध्ये गावसकर यांनी लिहिले होते की, “आयपीएल २०२०च्या प्लेऑफ सामन्यादरम्यान नटराजन एका मुलीचा पिता झाला होता. त्यानंतर तो थेट ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना झाला. नटराजन अजूनही ऑस्ट्रेलिया मध्येच आहे आणि ते देखील एक खेळाडू म्हणून नाही तर केवळ नेट गोलंदाज म्हणून. तो नवीन खेळाडू असल्यामुळे त्याला संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयावर आक्षेपही घेता आला नाही.”
“नटराजन जानेवारीतील तिसऱ्या आठवड्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका संपल्यानंतर आपल्या मुलीला भेटणार आहे. दुसरीकडे विराट महत्त्वपूर्ण मालिकेतील केवळ पहिला सामना खेळून भारतात परतला आहे,” असे गावसकरांनी पुढे लिहिले.
तसेच ते म्हणाले की, “मागील काही काळापासून अश्विनला संघर्ष करावा लागत आहे. त्याच्या गोलंदाजी क्षमतेत काही कमी आहे म्हणून नाही, तर यासाठी की तो संघाच्या बैठकीमध्ये आपले मत मांडतो. त्याच्याव्यतिरिक्त बाकी सर्व खेळाडू फक्त मान हलवतात. मग ते त्या गोष्टीशी सहमत असो किंवा नसो.”
गावसकर पुढे म्हणाले, “दुसर्या कोणत्याही देशात अशा गोलंदाजाचे स्वागत केले जाते, ज्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये ३५० पेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत. तसेच चार शतकेसुद्धा ठोकली आहेत. जर त्याने पहिल्या कसोटी सामन्यात विकेट्स घेतल्या नसत्या, तर त्याला आरामात दुसर्या कसोटीमधून बाहेर केले असते. असे कोणत्याही स्थापित फलंदाजाबाबत केले जात नाही. जर तो फ्लॉप ठरला, तर त्यानंतरही पुढील सामन्यात त्याला संधी मिळते आणि पुन्हा पुन्हा संधी मिळत राहते. मात्र, अश्विनसाठी पूर्णपणे वेगळे नियम आहेत.”
महत्त्वाच्या बातम्या-
‘भारतीय संघात वेगवेगळ्या खेळाडूंसाठी वेगवेगळे नियम’, माजी दिग्गजाची टीका
अवघ्या एक रुपयात पोटभर जेवण.! भारताच्या माजी खेळाडूने सुरू केले गरजूंसाठी उपहारगृह
गल्ली क्रिकेट खेळणाऱ्या चिमुकल्यात दिसली वॉर्नरची झलक; चाहत्यांचा व्हिडिओला मोठा प्रतिसाद