---Advertisement---

सुपर रे रहाणे, विराटला बाद करुन खुश झालास ना! कोहली धावबाद झाल्यानंतर भन्नाट मिम्स व्हायरल

On: गुरूवार, डिसेंबर 17, 2020 7:16 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रलिया संघात गुरुवारपासून (१७ डिसेंबर) चार सामन्यांची कसोटी मालिका सुरु झाली आहे. ऍडलेड येथे चालू असलेल्या या दिवसरात्र कसोटी सामन्यात कर्णधार विराट कोहलीने जबरदस्त फलंदाजी प्रदर्शन केले. परंतु, संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या चुकीमुळे विराट धावबाद झाला. यानंतर काही चाहत्यांनी ट्विटद्वारे दु:ख व्यक्त केले. तर काही चाहत्यांनी मजेदार मिम्स शेअर केले आहेत.

एका चाहत्याने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात विराटने आपली विकेट गमावल्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये जाऊन रुद्रावरतार धारण केला आहे. सोबतच तो पृथ्वी शॉ, मयंक अगरवाल, संघ प्रशिक्षक रवी शास्त्री यांना मारत आहे. तर रहाणे एका बाजूला उभा राहुन त्याला पाहत असतानाचा गमतीशीर व्हिडिओ पोस्ट केला आहे. एका चाहत्याने “सुपर रे रहाणे, विराटला बाद करुन खुश झालास ना,” असे तेलुगू कॅप्शन देत नाराजी व्यक्त केली आहे.

https://twitter.com/HaramiParindey/status/1339522250077216770?s=20

https://twitter.com/isaicharanreddy/status/1339525730145808386?s=20

कॉल देऊनही रहाणेने घेतली नाही धाव

झाले असे की, नाणेफेक जिंकून भारतीय संघाने प्रथम फलंदाजी निवडली. त्यामुळे युवा फलंदाज पृथ्वी शॉ आणि मयंक अगरवाल सलामीला फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरले. पण त्यांना संघाला चांगली सुरुवात करण्यात देण्यात यश आले नाही. शॉ डावातील दुसऱ्याच चेंडूवर बाद झाला. तर मयंक अगरवालही १७ धावांवरच पव्हेलियनला परतला. पुढे कसोटी स्पेशलिस्ट चेतेश्वर पुजाराही अर्धशतक पूर्ण करण्याच्या आतच झेलबाद झाला.

असे असले तरी, ३ विकेट्स गमावल्यानंतर कर्णधार विराट आणि उपकर्णधार रहाणेची जोडी मिळून संघाचा डाव पुढे नेत होती. त्यांनी ७७व्या षटकापर्यंत ८१ धावांची भागिदारीही केली. ७७व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर रहाणेने साधारण शॉट मारला. या चेंडूवर एक धाव घेण्याच्या उद्देशाने त्याने विराटला धावण्याचा इशारा केला. पण त्यानंतर रहाणे धावलाच नाही. मात्र विराट धाव पूर्ण करण्यासाठी पळाला होता. तेवढ्यात ऑस्ट्रलियन खेळाडूंनी चेंडू पकडला व स्टंपच्या दिशेने फेकला आणि विराट धावबाद झाला. अशाप्रकारे विराटने पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात ७४ धावा केल्या. यात त्याच्या ८ चौकारांचा समावेश होता.

महत्त्वाच्या बातम्या-

भारताला चौथा धक्का! अजिंक्य रहाणेच्या चुकीमुळे कर्णधार विराट कोहली रन आऊट?

AUS vs IND Test Live : कोहली धावबाद झाल्यानंतर रहाणेही परतला तंबूत; ८१ षटकात भारत ५ बाद १९६ धावांवर

पहिल्या कसोटी सामन्याच्या एक दिवसआधीच केली होती टीम इंडियाने प्लेइंग XI ची घोषणा; ‘हे’ होते कारण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---