येत्या काही दिवसात इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचे १५ (Ipl 2022) वे हंगाम सुरू होणार आहे. या स्पर्धेत अहमदाबाद आणि लखनऊ हे दोन नवीन संघ खेळताना दिसून येणार आहेत. काही दिवसांपूर्वीच लखनऊ संघाने आपल्या संघाचे नामकरण करत ‘लखनऊ सुपर जायंट्स’ (Lucknow super giants) असे ठेवले होते. आता सोमवारी (३१ जानेवारी) या संघाने लोगोचे अनावरण केले आहे. संघाचे नाव आणि लोगो हे ‘पुणे सुपरजायंट्स’ संघासारखेच असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, चाहत्यांनी या संघाच्या लोगोचे अनावरण झाल्यानंतर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
यापूर्वी २०१६ आणि २०१७ मध्ये संजीव गोयंका यांच्या मालकीचा पुणे सुपरजायंट्स संघ आयपीएल स्पर्धेत खेळताना दिसून आला होता. आता लखनऊ संघाची फ्रँचायझी देखील संजीव गोयंका यांच्याकडेच आहे. तसेच आता लखनऊ संघाचे नाव आणि लोगो पुणे सुपरजायंट्स संघासरखेच असल्याचे दिसून येत असल्याने चाहत्यांनी मजेशीर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे.(Fans reactions on Lucknow super giants new logo)
लोगोचे अनावरण झाल्यानंतर चाहत्यांनी लखनऊ सुपर जायंट्स संघाची खिल्ली उडवली आहे. एका चाहत्याने लिहिले की, पुणे सुपर जायंट्स आणि लखनऊ सुपर जायंट्सच्या लोगोमध्ये फक्त इतकाच बदल करण्यात आला आहे की, लोगोचा रंग बदलण्यात आला आहे आणि बॉल ऐवजी बॅटचा समावेश करण्यात आला आहे. तर आणखी एका युजरने फोटो शेअर करत लिहिले की, “इतकी जास्त उत्सुकता वाढवायची गरज नव्हती.”
https://twitter.com/smileandraja/status/1488140785161846794?t=qgFmHSfDisl2BksGj3lwJw&s=19
Facts
Lucknow IPL Logo#LucknowSuperGiants #IPL #LucknowIPLTeam
credits : @/gaydev_unadcutt pic.twitter.com/eSWRPdfvka— Kose Mourinho (@Koksalviz) January 31, 2022
PowerPoint after being used to create that ugly #LucknowSuperGiants logo. @klrahul11 you'll have to fix that too pic.twitter.com/h90D0qL7ly
— Ibu Hatela™ (@Esmilebhai) February 1, 2022
Spent all the money buying the franchise and nothing left to pay the logo designer!!
₹7090 cr team ffs!🤦🏻♂️ #LucknowSuperGiants pic.twitter.com/XHG4Ddg3X4— vyom (@Vyom_31) January 31, 2022
https://twitter.com/Ansari_shaaab/status/1488344944733405184?t=_N7mpThERmBbQn6chZ-Rnw&s=19
संजीव गोयंका यांच्या मालकीच्या लखनऊ सुपर जायंट्स संघाचे कर्णधारपद केएल राहुलला देण्यात आले आहे. तसेच या संघात रवी बिश्नोई आणि मार्कस स्टोइनिस यांचा देखील समावेश करण्यात आला आहे. आरपी संजीव गोयंका ग्रुपने ७०९० कोटींची बोली लावली आणि लखनऊ संघ खरेदी केला. आगामी हंगामासाठी गौतम गंभीरची मेंटोर म्हणून या संघात निवड करण्यात आली आहे.
पुणे सुपर जायंट्स संघाचे कर्णधारपद २०१६ मध्ये एमएस धोनीला देण्यात आले होते. तर २०१७ मध्ये या संघाचे कर्णधारपद स्टिव्ह स्मिथकडे सोपवण्यात आले होते.
महत्वाच्या बातम्या :
रोहित अँड कंपनी अहमदाबादमध्ये दाखल, ‘इतके’ दिवस खेळाडू राहाणार क्वारंटाईन
‘लीडर होण्यासाठी कर्णधार असणे गरजेचं नाही’, धोनीचे उदाहरण देत विराटचे मोठे भाष्य
वाढदिवस विशेष: एक हात मोडला असताना ग्रॅमी स्मिथ आला मैदानात, पुढे काय झाले पाहाच!