Ranji Trophy: भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे याच्यासाठी रणजी ट्रॉफीचा हा मोसम फारसा चांगला जात नाही. मुंबईकडून खेळताना तो आत्तापर्यंत पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. अजिंक्य रहाणे सलग दोन सामन्यांत खाते न उघडता पहिल्याच चेंडूवर बाद झाला. सर्वप्रथम तो आंध्रविरुद्धच्या सामन्यात गोल्डन डकचा बळी ठरला. यानंतर केरळविरुद्धच्या सामन्यातही तो पहिल्याच चेंडूवर एकही धाव न काढता पॅव्हेलियनमध्ये परतला.
अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याने केरळविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याचा निर्णय योग्य ठरला नाही आणि संघाने एकही धाव न करता दोन विकेट्स गमावल्या. जय बिश्ता आणि रहाणे खाते न उघडताच बाद झाले. दोघेही पहिल्याच चेंडूवर बाद झाले. रहाणे बसिल थम्पी याच्या गोलंदाजीवर संजू सॅमसन (Sanju Samson) याच्या हाती झेलबाद झाला. अशाप्रकारे रहाणे सलग दोन डावात गोल्डन डकचा बळी ठरला. (fans reacts as ajinkya rahane registered 2nd consecutive golden duck in ranji trophy)
अजिंक्य रहाणेच्या या खराब कामगिरीवर ट्विटरवर अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. एका युजरने लिहीले, “रोहित शर्माने कर्णधार म्हणून एक चांगली गोष्ट केली ती म्हणजे त्याने रहाणे आणि पुजाराला संघातून काढून टाकले.”
https://twitter.com/VedPathak35/status/1748219002793685298?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1748219002793685298%7Ctwgr%5E1785800210cd58d4f1e2f7bf044a2bb67f6e5866%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.sportskeeda.com%2Fcricket%2Ffans-reacts-as-ajinkya-rahane-registered-2nd-consecutive-golden-duck-in-ranji-trophy
रहाणेसाठी कोणताही विश्रांतीचा दिवस नाही.
No rest days for rahane ☺
— Vedant (@vjoshi_22) January 19, 2024
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर काही लोकांना वाटत होतं की, रहाणे भारतीय संघात हवा होता. पण रहाणे आणि पुजाराला खूप संधी मिळाल्या पण दोघांनाही त्या संधींचा फायदा उठवता आला नाही.
Few morons wants this guy in test team after 1st test lossat SA.
Rahane and pujara both had many chances but they didn't utilized those https://t.co/AMCyOsFosr
— Sasidhar🔥🧊 (@sasidhar205) January 19, 2024
या ट्विटनंतर अजिंक्य रहाणेची कामगिरी.
Rahane since this tweet :-
2 Matches
2 Golden Ducks😭😭😭😭😭😭 https://t.co/ilZDL3j74S
— Robert (@B3tt3rCallSa7L) January 19, 2024
रहाणे आता रणजी ट्रॉफी सामन्यांमधेही संपला आहे.
Rahane is finished even in Ranji Trophy
— Dhaanush (@SuperSportsmass) January 19, 2024
हेही वाचा
‘तुम्हाला धैर्याने खेळायला शिकवू शकत नाही…’, श्रीलंकेविरुद्धच्या पराभवानंतर सिकंदर रझा संतापला
‘माझा रामलल्ला विराजमान झाला…’, माजी पाकिस्तानी क्रिकेटरने प्रभू रामांचा फोटो शेअर करत जिंकली लाखो मने