---Advertisement---

कार्तिकच्या नावाची चाहत्यांकडून नारेबाजी, फिल्डिंग करत असलेल्या मुरली विजयने थेट जोडले हात

On: मंगळवार, जुलै 26, 2022 9:30 PM
Murali-Vijay-Video
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचे २ खेळाडू मुरली विजय आणि दिनेश कार्तिक भारताचे प्रतिनिधित्त्व करणाऱ्या २ महान खेळाडूंपैकी एक आहेत. दिनेश कार्तिकने नुकतेच भारतीय संघात दमदार पुनरागमन केले आहे आणि आपल्या क्रिकेट अध्यायाची पुन्हा नवी सुरुवात केली आहे. दुसरीकडे मुरली विजय भारतीय क्रिकेट संघापासून दूर असून सध्या तमिळनाडू प्रीमियर लीगद्वारे पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर उतरला आहे.

दरम्यान मुरली विजयचा (Murali Vijay) एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दिनेश कार्तिकचाही (Dinesh Karthik) उल्लेख केला गेला आहे.

तमिळनाडू प्रीमियर लीग २०२२ मध्ये (Tamilnadu Premier League) मुरली विजय रुबी त्रिची वॉरियर्स संघाचे प्रतिनिधित्त्व करतो आहे. या संघाकडून शानदार शतक झळकावल्यानंतर मुरली विजय चर्चेत आला होता. यानंतर आता पुन्हा एकदा तो चर्चेत आला आहे. तमिळनाडू प्रीमियर लीगमधील एका सामन्यादरम्यान मुरली विजय सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करत होता. यावेळी चाहते मुरली विजयकडे पाहून दिनेश कार्तिकच्या (Fans Shout Dinesh Karthik Name) नावाचे नारे लावू लागले. त्यानंतर मुरली विजयने चाहत्यांकडे बघून त्यांच्यापुढे हात जोडले. 

मुरली विजयच्या या प्रतिक्रियेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कार्तिकचे नाव ऐकून चाहत्यांना हात जोडून त्याचे नाव न घेण्याची विनंती करणाऱ्या मुरली विजयच्या प्रतिक्रियेला चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात लाईक्सही मिळत आहेत. 

दरम्यान मुरली विजय क्रिकेटमधून छोटा ब्रेक घेतल्यानंतर तमिळनाडू प्रीमियर लीगमध्ये उतरला आहे. या लीगमधील पहिल्या सामन्यात त्याने ५७ चेंडूत शानदार शतक झळकावले आहे. अशाप्रकारे त्याने क्रिकेटमधील आपले पुनरागमन गाजवले आहे.

मुरली विजयच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने ६१ कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्त्व केले आहे. यादरम्यान त्याच्या बॅटमधून ३९८२ धावा निघाल्या आहेत. तर १७ वनडे सामने खेळताना त्याने ३३९ धावा केल्या आहेत. याखेरीज त्याला ९ टी२० सामने खेळण्याचीही संधी मिळाली आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

‘मी कधीच सेहवाग होऊ शकत नाही’, उपस्थित केलेल्या प्रश्नावर भारतीय दिग्गजाचं दिलखुलास उत्तर

बीसीसीआयला मिळाला नवा स्पॉन्सर! तब्बल इतक्या कोटींचा झाला करार

‘मीच आहे शुबमन गिलचा मोठा चाहता…’, न्यूझीलंडच्या माजी कर्णाधाराच्या वक्तव्याची होतीये चर्चा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---