भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात रविवारी (२४ ऑक्टोबर) दुबई येथे आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ चा महामुकाबला रंगला होता. प्रथम फलंदाजी करताना या सामन्यात भारताने २० षटकांमध्ये ७ विकेट्सच्या नुकसानावर १५१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या सलामीवीरांनी अभेद्य १५२ धावांची भागिदारी करत १८ व्या षटकातच त्यांचे लक्ष्य गाठले आणि भारतावर १० विकेट्स राखून ऐतिहासिक विजय मिळवला.
अनुभवी अष्टपैलू शोएब मलिकही या सामन्यात पाकिस्तानच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग होता. या सामन्यादरम्यान क्रिकेट चाहत्यांचे त्याच्यावरील प्रेम पाहायला मिळाले. यासंदर्भातचा व्हिडिओ स्वत: त्याची पत्नी सानिया मिर्झाने शेअर केला आहे.
भारताची प्रसिद्ध टेनिसपटू सानिया हिने तिच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन मुबीन नामक एका ट्विटर वापरकर्त्याने शेअर केलेला हा व्हिडिओ रिट्वीट करत हसण्याचे आणि हृदयाचे इमोजी कॅप्शनमध्ये टाकले आहेत. या व्हिडिओत दिसते की, मलिक सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करण्यासाठी उभा आहे. यावेळी त्या सीमारेषेजवळील स्टेडियमच्या भागामध्ये बसलेले काही चाहते उठून मोठमोठ्या ओरडू लागतात. ‘जीजाजी… जोरसे बोलो जीजाजी’, अशा गमतीशीर शब्दांमध्ये ते ओरडतात.
🤣🤣❤️❤️ https://t.co/NE46xoSKfu
— Sania Mirza (@MirzaSania) October 25, 2021
त्या वापरकर्त्याने या व्हिडिओचे कॅप्शनही अतिशय मजेदार दिले आहे. कॅप्शनमध्ये त्या वापरकर्त्याने लिहिले आहे की, ‘मलिकवर इतके प्रेम, माशाअल्लाह.’ कदाचित त्याच्या कॅप्शनला पाहूनच सानियाने हसण्याचे इमोजी टाकले असावेत. शोएब आणि सानियाने २०१० मध्ये लग्न केले होते. त्यांना इजहान नावाचा मुलगा आहे.
शोएबच्या या सामन्यातील प्रदर्शनाविषयी बोलायचे झाल्यास, तो प्लेइंग इलेव्हनचा भाग असूनही त्याला ना गोलंदाजाची संधी मिळाली ना फलंदाजीची. परंतु येत्या सामन्यात त्याला संधी मिळाल्यास तो आपला सर्वोत्कृष्ट खेळ दाखवताना दिसेल.
महत्वाच्या बातम्या-
आफ्रिदीचा ओव्हरथ्रो आणि भारताला मिळाल्या जास्तीच्या ४ धावा; पाहून जय शहा, अक्षय कुमारही लागले नाचू
‘ही धोक्याची घंटा नव्हे, ही तर सुरुवात’, पाकिस्ताविरुद्धच्या पराभवानंतर कोहलीने वाढवले संघाचे मनोबल