---Advertisement---

लज्जास्पद! भारताच्या पराभवानंतर शमीवर धार्मिक टीका; सहकारी उतरले समर्थनात

On: सोमवार, ऑक्टोबर 25, 2021 5:40 PM
---Advertisement---

दुबई येथील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर रविवारी (२४ ऑक्टोबर) आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही आशियातील बलाढ्य संघ समोरासमोर होते. या सामन्यात भारतीय संघाला विजयाचा प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र, पाकिस्तान संघाने खेळाच्या तिन्ही प्रकारात चमकदार कामगिरी करून भारतीय संघावर १० गडी राखून ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयासह भारताचे पाकिस्तानवरील २९ वर्षापासून विश्वचषकातील विजयाचे सत्र थांबले. या पराभवानंतर मात्र भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याच्यावर अनेकांनी अत्यंत खालच्या दर्जाची टीका करण्यास सुरुवात केली आहे.

शमीवर होत आहे टीका
विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात भारतीय संघाचा दारुण पराभव झाल्याने अनेक क्रिकेटप्रेमी कमालीचे नाराज झाले आहेत. काहींनी खेळाडूंवर वैयक्तिक टीका करण्यास सुरुवात केली असून, ही टीका अत्यंत हीन दर्जाच्या भाषेत केली जातेय. पाकिस्तान विरुद्ध काहीसा महागडा ठरलेला भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याच्यावर तर अनेकांनी सांप्रदायिक व धार्मिक टीका करण्यास सुरुवात केली.‌ अनेक ट्विटर हँडलवरून त्याला ‘भारतीय संघातील पाकिस्तानी’, तुला हे करण्याचे किती पैसे मिळाले तसेच त्याच्या धर्मावरून अपशब्द बोलले जात आहेत.

https://twitter.com/vaikivannavan/status/1452329026027151362?t=skwXPeDNoSJGc6Cnh_yJSg&s=19

दुसरीकडे काही समजदार चाहत्यांनी शमीला पाठिंबा दर्शवला असून, हार-जीत हा खेळाचा भाग असल्याचे व ते खिलाडूवृत्तीने स्वीकारण्याचे आवाहन केले आहे. भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग व माजी अष्टपैलू इरफान पठाण यांनीदेखील शमीच्या समर्थनात ट्विट केले आहेत.

पहिल्या सामन्यात महागडा ठरला शमी
पहिल्या सराव सामन्यात इंग्लंड विरुद्ध तीन बळी मिळवणारा शमी या सामन्यात महागडा ठरला. त्याने ३.५ षटके गोलंदाजी करताना ४५ धावा दिल्या. यामध्ये एकाही बळीचा समावेश नव्हता. त्याच्या गोलंदाजीवर एकूण सहा चौकार व एक षटकार लगावला गेला. या सामन्यात भारताचा एकही गोलंदाज बळी घेण्यात यशस्वी ठरला नाही व संघाला १० धावांनी मोठा पराभव पत्करावा लागला. भारतीय संघाचा पुढील सामना ३१ ऑक्टोबर रोजी याच मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध होईल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---