भारतीय संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावरील टी20 मालिका आणि एकदिवसीय मालिका पार पडल्या. आता कसोटी मालिकेला सुरुवात होईल. कसोटी मालिकेसाठी बीसीसीआयने भारताच्या ताफ्यात काहीव बदल केले आहेत. या मालिकेत भारताच्या कर्णधारपदी केएल राहुल तर उपकर्णधारपदी चेतेश्वर पुजारा यांची निवड करण्यात आली. भारतीय कसोटी संघात रिषभ पंत याचादेखील समावेश आहे. मात्र, उपकर्णधारपदासाठी त्याचा विचार करण्यात आला नाही. आता बीसीसीआयच्या या निवडींवर चाहत्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
बांगलाादेश विरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांसाठी बीसीसीआयने भारताच्या कसोटी ताफ्यात काही बदल केले. कर्णधार रोहित शर्मा दुखापतीमुळे पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला तर, वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) पूर्ण कसोटी मालिकेतून बाहेर पडले. पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केएल राहुल (KL Rahul) करणार असून, उपकर्णधारपदाची जबाबदारी चेतेश्वर पुजारा याच्या खांद्यावर देण्यात आली. या मालिकेत रिषभ पंत (Rishabh Pant) देखील भारतीय संघात सामील आहे. मात्र, उपकर्णधारपद त्याला दिले नाही. बीसीसीयच्या या निर्णयावर चाहते नाराज झाले. भारतीय संघात स्थिरता नसल्याने चाहते नाराज आहेत.
रोहित शर्मा (Rohit Sharma) दुसरा कसोटी सामना खेळणार की नाही यावर अद्याप निर्णय झालेला नाही. दुसऱ्या सामन्यात रोहित पुनरागमन करेल अशी चाहत्यांना अपेक्षा आहे. त्याला बांगलादेश विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अंगठ्याला दुखापत झाली होती. बांगलादेश दौरा भारतीय संघासाठी चांगला ठरला नाही. भारताने आधी टी20 मालिका गमावली आणि नंतर एकदिवसीय मालिका देखील गमावली. आता भारतीय संघ कसोटी मालिकेत चांंगले प्रदर्शन करेल अशी अपेक्षा चाहते करत आहेे.
भारत आणि बांगलादेश या संघात 14-18 डिसेंबर यादरम्यान पहिला कसोटी सामना खेळवला जाणार असून दुसरा कसोटी सामना 22-26 डिसेंबरला खेळवला जाईल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इंग्लंडपुढे पाकिस्तान पुन्हा नतमस्तक! मुलतान कसोटीतही दिसली बझबॉलची जादू
धोनीचा ऑटोग्राफ घेण्यासाठी चाहत्याने वापरली ‘ही’ अनोखी पद्धत, सुंदर व्हिडिओ होतोय व्हायरल






