वेस्ट इंडीजविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेसाठी गुरुवारी (१४ जुलै) भारतीय संघाची घोषणा केली गेली. विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह या दिग्गजांची नावे या संघातून वगळली गेली आहेत. या दोघांव्यतिरिक्त संजू सॅमसनलाही संघातून वगळले गेले आहे. सॅमसनने आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात ४२ चेंडूत ७७ धावांची खेळी केली होती. त्यानंतर त्याला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही आणि नंतर तो मायदेशी परतला होता.
संजू सॅमसन (Sanju Samson) याला पुन्हा एकदा संघातून वगळल्यामुळे चाहते मात्र चांगलेच भडकले आहेत. सोशल मीडियावर भारतीय संघांच्या निवडकर्त्यांवर चांगलीच टीका केली जात आहे. चाहते आरोप करत आहेत की, बीसीसीआय आणि निवडर्त्यांच्या राजकारणामुळे सॅमसनला संघात संधी मिळत नाहीये. तसेच वेगवेगळे मिम्सही व्हायरल होत आहेत.
https://www.instagram.com/p/Cf_WHxIpQkp/?utm_source=ig_web_copy_link
What wrong did this guy do to be not even in the squad?
•Is it because he is from Kerala ?
•Is it because of lack of fancy hairstyle, piercings or tattoos ?
•Is it because he cares about team's need other than his stats?
Pity on @BCCI politics 🖕🤬#SanjuSamson pic.twitter.com/OgSOqKhDIw
— AJ 🌟 (@AJ_Star_21) July 14, 2022
Like and Retweet if you also feel SANJU SAMSON should have been selected ahead of Shreyas Iyer #SanjuSamson #JusticeforSanju pic.twitter.com/lTzZU1rMNV
— HITMAN45💙 🇮🇳 (@alex_bireswar) July 14, 2022
This guy deserves better 💔#SanjuSamson pic.twitter.com/BqjTxpz6zE
— Crypto Bwoy (@AnekhC7) July 14, 2022
एकट्या सॅमसनवर अन्याय झाला आहे, असे नाही. चाहते राहुल त्रिपाठीला संघात न निवडल्यामुळेही नाराज आहेत. राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi) आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यात सहभागी होता. परंतु एकाही सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याला संधी मिळाली नाही. अशातच अता अचानक त्याला संघातून बाहेर केल्यामुळे चाहत्यांचा राग सोशल मीडियावर दिसून येत आहे.
What the hell, what the hell
What are you guys doing
What's #ishankishan , #Shreyasiyer , #harshalpatel doing in the team. Where are #Rahultripathi and #SanjuSamson ?
Why God why, why are you doing this 😫😫😫#BCCI #INDvsWI— . (@SuhaniS78159712) July 14, 2022
या खेळाडूंना संघात संधी मिळाली नसली, तरी दुखापतीमुळे मागच्या बऱ्याच दिवसांपासून संघातून बाहेर असलेल्या कुलदीप यादव आणि केएल राहुल या दोघांना मात्र पुन्हा संधी मिळाली आहे. राहुल आणि कुलदीप दुखापतीतून सावरले असल्याचे समोर येत आहे, परंतु त्यांच्या खेळण्याविषयी खात्री नसल्याचे बीसीसीआयकडून कळवले गेले आहे. या दोघांच्या फिटनेसवर अवलंबून असेल की, त्यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणार की नाही?
वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यातील टी-२० मालिकेची सुरुवात २९ जुलै रोजी होईल. पहिला सामना त्रिनिदादमध्ये, तर पुढचे दोन सामने अनुक्रमे १ आणि २ ऑगस्ट रोजी सेंट किट्समध्ये खेळले जातील. त्यानंतर चौथा आणि पाचवा टी-२० सामना फ्लोरिडामध्ये ७ आणि ८ ऑगस्टला खेळवला जाईल.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदिप यादव, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
एकाच संघात ४ यष्टीरक्षक, पण यष्टीमागे पंतभाऊच उभा ठाकणार! पाहा कोण आहेत ते चौघे
आयसीसी क्रमवारीत अव्वल असलेला जसप्रीत बुमराह विंडीजच्या दौऱ्यातून बाहेर, कारण माहितीय का?
अश्विनचं पुनरागमन, तर युवा बिश्नोईवरही जबाबदारी; विडिंजविरुद्ध भारताची फिरकी फळी आहे मजबूत!