भारतीय संघाचा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत याला एमएस धोनीचे उत्तराधिकारी मानले जाते. तो फलंदाजी असो किंवा यष्टिरक्षण दोन्हीही गोष्टींमध्ये भारतीय संघाच्या विजयात मोलाचे योगदान देत असतो. सध्या नॉटिंघममध्ये भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांचा बोलबाला होता. दरम्यान रिषभ पंतने असे काही कृत्य केले, ज्याने चाहत्यांना एमएस धोनीची आठवण करून दिली.
भारतीय संघाला दुसरा गडी मोहम्मद सिराजने बाद करून दिला होता. परंतु यामध्ये रिषभ पंतने मोलाचे योगदान दिले होते. सिराजने अप्रतिम चेंडू टाकला जो फलंदाज जॅक क्रॉउलिला कळालाच नाही. तो चेंडू फलंदाजाला चकावून सरळ यष्टिरक्षक रिषभ पंतच्या ग्लोव्ह्जमध्ये गेला होता. सर्व खेळाडूंनी पंचांकडे जोरदार मागणी केली. परंतु पंचांनी ही मागणी फेटाळून लावली होती.
यावेळी कर्णधार विराट कोहली डीआरएस घेण्यास नकार देत होता. कारण ३ चेंडूंपूर्वी भारतीय संघाने रिव्ह्यू गमावला होता. विराट कोहलीला माहीत नव्हते की, चेंडू बॅटला लागला आहे की नाही? सिराजला वाटत होते की, चेंडू बॅटला लागला आहे. विराट कोहली नकार देत असताना देखील रिषभ पंत आपल्या मुद्द्यावर ठाम होता. शेवटी त्याने कोहलीला रिव्ह्यू घेण्यास राजी केले. त्यानंतर जेव्हा तिसऱ्या पंचांनी क्रॉउलिला बाद घोषित केले. त्यावेळी विराट आणि रिषभ पंतचा आनंद पाहण्यासारखा होता.
चाहत्यांना आली धोनीची आठवण
पंतचा हा कारनामा पाहून चाहत्यांना धोनीची आठवण आली आहे. डीआरएसचा योग्य वेळी वापर करण्यासाठी धोनी प्रसिद्ध होता. त्यामुळे चाहते रिषभची तुलना धोनीसोबत करू लागले आहेत.
एका युजरने प्रसिद्ध वेब सिरीज मिर्झापूर मधील “धीरे धीरे सिख रहे हो..” या डायलॉगचा फोटो ट्विट केला आहे. ज्यावर त्याने कॅप्शन म्हणून “रिषभ पंतने घेतलेले २ डीआरएस यशस्वी,” असे लिहिले आहे. तसेच दुसऱ्या एका युजरने विराट कोहली रिषभ पंतला पाहून टाळ्या वाजवत असल्याचा फोटो शेअर केला आहे.
2 DRS taken by Rishabh Pant got successful
Dhoni: pic.twitter.com/j2tp359uP8
— Kisslay Jha🇮🇳 (@KisslayJha) August 4, 2021
Virat Kohli clapping for Rishabh Pant for convincing him for the review. pic.twitter.com/eigsTftblR
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 4, 2021
Rishabh Pant, the hero we don't deserve. #ENGvIND pic.twitter.com/vHy619kcP1
— Isabelle Westbury (@izzywestbury) August 4, 2021
When ball hit pad and virat ignores pant and asked to bowler Le pant :- #INDvENG #RishabhPant pic.twitter.com/uUDrCfq9cB
— shubham priyadarshi (@shubham43746919) August 4, 2021
#RishabhPant like #MSDhoni
Behindwood words in between pic.twitter.com/geRbO59b6A
— sreekanth (@sreekanth______) August 3, 2021
तसेच आणखी एका युजरने एक मिम शेअर केले आहे, ज्यामध्ये एमएस धोनीने म्हटले होते की, “मी नेहमी या गोष्टीवर विश्वास ठेवला आहे की, प्रक्रिया ही नेहमी निकालापेक्षा जास्त महत्वाची असते.” तसेच या फोटोमध्ये रिषभच्या पुढे, “मी नेहमी प्रक्रियेवर विश्वास ठेवणार निकालाची चिंता करणार नाही,” असे लिहिण्यात आले आहे.(Fans started comparing rishabh pant with ms dhoni after his brilliant work on day 1)
महत्त्वाच्या बातम्या-
ENGvIND: कर्णधार कोहलीने अश्विनऐवजी का केली जडेजाची निवड? हरभजन सिंगने केले स्पष्ट
बांगलादेशने पहिल्यांदाच टी२०त मात दिल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंची भर मैदानात ‘अशी’ कृती
जबरदस्त! टप्पा घेतला, बॅटमधून मिस झाला अन् थेट पॅडला धडकला; शार्दुलच्या चेंडूवर रूटचे लोटांगण