---Advertisement---

‘लखनऊ सुपरजायंट्स’ नाव पाहाताच सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस; युजर्सने लावला पुण्याच्या टीमची संबंध

On: मंगळवार, जानेवारी 25, 2022 8:16 AM
Lucknow Supergiants
---Advertisement---

येत्या काही महिन्यात इंडियन प्रीमियर लीग २०२२ (IPL 2022) स्पर्धेचा थरार पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेत काही महत्त्वाचे बदल पाहायला मिळणार आहे. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी खेळाडूंचा लिलाव करण्यात येणार आहे, तर या हंगामात दोन नव्या संघांनी प्रवेश केला आहे. यावर्षी ८ नव्हे तर १० संघ मैदानात उतरणार आहेत. ज्यामध्ये लखनऊ आणि अहमदाबाद या दोन्ही संघांचा समावेश आहे. या दोन्ही संघांनी आगामी हंगामासाठी रिटेन केलेल्या खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. दरम्यान नुकताच लखनऊ (Lucknow) संघाने आपल्या संघाच्या संघाच्या नावाचे नामकरण केले आहे. ज्यावर चाहत्यांनी दिलेल्या प्रतिक्रीया सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

लखनऊ संघाचे नाव ‘लखनऊ सुपर जायंट्स’ (Lucknow super giants)असे ठेवण्यात आले आहे. संघाचे मालक संजीव गोयंका यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत या नावाची घोषणा केली आहे. यापूर्वी लखनऊ संघाने आपल्या अधिकृत सोशल मीडियावर चाहत्यांना संघाचे नाव काय असायला हवे याबाबत प्रश्न विचारला होता. आता या संघाचे अंतिम नाव समोर आले आहे.

यापूर्वी आयपीएलमध्ये २०१६-२०१७ या दोन वर्षांसाठी दाखल झालेल्या संजीव गोयंका यांच्या मालकीच्या संघाचे नाव पुणे सुपर जायंट्स होते. आता यावरून चाहत्यांनी लखनऊ संघाला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

एका युजरने पुणे सुपर जायंट्स संघाची जर्सीचा फोटो शेअर केला आहे. ज्यावर त्याने कॅप्शन म्हणून, आश्चर्यचकित मुळीच होऊ नका जर, तुम्हाला लखनऊ सुपर जायंट्स संघाची हीच जर्सी दिसली तर” असे लिहीले आहे. तर दुसऱ्या एका युजरने मीम शेअर करत लिहिले की, “जेव्हा चाहत्यांना कळाले की, लखनऊ संघाचे नाव काय” या ट्विटमध्ये युजरने ‘ तोबा तोबा सारा मुड खराब कर दिया’ हे मीम शेअर केले आहे.

https://twitter.com/DebAnu2002/status/1485657294121881607?t=KHCGqGzvicn9QB0rWhqbpw&s=19

आगामी हंगामात केएल राहुल लखनऊ संघाचे नेतृत्व करताना दिसून येणार आहे. तर फिरकीपटू रवी बिष्णोई आणि ऑस्ट्रेलियाचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टोइनिस यांना देखील रिटेन केले आहे.

महत्वाच्या बातम्या :

आठवण मोहिंदर अमरनाथ यांनी सहा टाके घातल्यानंतरही केलेल्या ‘त्या’ झुंजार खेळीची

वाढदिवस विशेष: टीम इंडियाची माॅडर्न एराची भिंत, चेतेश्वर पुजारा!

हे नक्की पाहा:

नेमका जॉन राईट आणि सेहवाग मध्ये वाद तरी काय होता? । Sehwag and John Wright Controversy

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---