इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने 434 धावांनी जिंकला. भारतीय संघाकडून या सामन्यात विजयासाठी इंग्लंडला 557 धावांचे लक्ष्य मिळाले होते. पण इंग्लंड संघ शेवटच्या डावात अवघ्या 122 धावांवर सर्वबाद झाला. या विजयानंतर भारताने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. केएल राहुल या सामन्यासाठी उपस्थित नव्हता. पण त्याच्या अनुपस्थितीत भारताने धावांचा पाऊस पाडला. भारताने राजकोट कसोटी जिंकल्यानंतर राहुलचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
केएल राहुल भारतीय संघाचा महत्वाचा फलंदाज आहे. पण दुखापतीच्या कारणास्तव त्याला इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळता आले नाही. तिसऱ्या कसोटी सामन्यात राहुलच्या जागी देवदत्त पडिक्कल याला बदली खेळाडू म्हणून संघात घेतले गेले होते. मालिकेतील चौथा कसोटी सामना 23 फेब्रुवारी रोजी रांचीमध्ये सुरू होणार आहे. राहुल या सामन्यात खेळताना दिसण्याची अपेक्षा आहे. तत्पूर्वी यष्टीरक्षक फलंदाज कर्नाटकच्या तुमकूर जिल्ह्यात स्थित एका प्राचीन श्री सिद्धगंगा आश्रमात दर्शनासाठी पोहोचला. यावेळी त्याच्यासोबत आई आणि वडील देकील उपस्थित होते.
केएल राहुल आपल्या आई-वडिलांसोबत मंदिरात दर्शन घेतले. दर्शनानंतर भारतीय क्रिकेटपटू आणि त्याचे कुटुंबिय आश्रमाबाहेर पडला, तेव्हा चाहत्यांनी मोठ्या संखेत उपस्थिती लावली. राहुल आश्रमातून गाडीपर्यंत पोहोचेपर्यंत त्याला सुरक्षारक्षकांनी गर्दीतून जागा करून दिली. हा व्हिडिओ सोमवारी (19 फेब्रुवारी) सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.
Eeroju Tumkur lo @klrahul annani chala daggarundi chusa pic.twitter.com/tbDgbtUIsu
— 🚶 (@Akhilrc18_) February 18, 2024
केएल राहुल इंग्लंडविरुद्ध पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाचा भाग होता. पण पहिल्या कसोटी सामन्यानंतर दुखापतीमुळे तो संघातून बाहेर जाला. शेवटच्या तीन कसोटी सामन्यात तो खेळणार की नाही, याविषयी संभ्रम असताना निवडकर्त्यांनी त्याला शेवटच्या तीन कसोटी सामन्यांसाठी संघात निवडले. आता मालिकेती चौथ्या कसोटी सामन्यासाठी राहुल स्वतःची फिटनेस सिद्ध करू शकला, तर त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली जाऊ शकते.
महत्वाच्या बातम्या –
IPL 2024 आधी चमकलं दुष्मंथा चमीराचं नशीब! केकेआरच्या इंग्लिश गोलंदाजाला केले रिप्लेस
IND vs ENG : भारताला आता ‘या’ दिग्गजाची कमी जाणवणार नाही! जयस्वालविषयी माजी कर्णधाराचे मोठे विधान