शनिवारी (दि. 07 ऑक्टोबर) दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअम येथे दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका संघात विश्वचषक 2023चा चौथा सामना खेळला गेला. या सामन्यात दोन्ही संघांच्या खेळाडूंचे जबरदस्त प्रदर्शन पाहायला मिळाले. आधी दक्षिण आफ्रिकेने फलंदाजी करताना धावांचा भलामोठा डोंगर रचत विश्वविक्रम केला. त्यानंतर आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या श्रीलंका संघानेही कडवी झुंज दिली. मात्र, शेवटी श्रीलंका संघाला 102 धावांनी सामन्यावर पाणी सोडावे लागले. असे असले, तरीही सर्व वाहवा कागिसो रबाडा आणि त्याच्या वडिलांनी सर्व वाहवा लुटली. ती कशी, तर चला जाणून घेऊयात…
झाले असे की, दक्षिण आफ्रिका (South Africa) संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 428 धावांचा डोंगर उभारला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकन फलंदाजांच्या नाकी नऊ आल्या. त्यांना 44.5 षटकात दहाच्या दहा विकेट्स गमावत फक्त 326 धावा करता आल्या. यावेळी श्रीलंकेच्या 10 विकेट्सपैकी 2 विकेट्स या भेदक गोलंदाज कागिसो रबाडा याने आपल्या नावावर केल्या. आपल्या मुलाला शानदार गोलंदाजी करताना पाहून कागिसो रबाडाचे वडील एमफो रबाडा (Mpho Rabada) हे भलतेच खुश झाले. ते यावेळी जल्लोष करतानाही दिसले.
चाहत्यांनी घेतला सेल्फी
विशेष म्हणजे, सामन्यादरम्यान कागिसो रबाडाच्या वडिलांनी (Kagiso Rabada’s Father) सर्व मैफील लुटली. अरुण जेटली स्टेडिअम येथे काही चाहते त्यांच्यासोबत सेल्फी घेतानाही दिसले. यावेळी चाहते भारतीय संघाची जर्सी घालून एमफो रबाडा यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी गर्दी करताना दिसले. यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर जंगलात लागलेल्या वणव्यासारखा पसरत आहे. यावेळी चाहत्यांनीही व्हिडिओवर कमेंट्सचा पाऊस पाडला.
Kagiso Rabada's father taking selfies with fans at Arun Jaitley Stadium. https://t.co/bkh2ikigvL
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 7, 2023
एकाने कमेंट करत लिहिले की, “हेच भारत आहे. अतिथी देवो भव:”
This is what 🇮🇳 is all about . Atithi devo bhava 🙏
— Rainbow Salt (@Rainbowsalts91) October 7, 2023
आणखी एकाने लिहिले की, “हे भारतीय पण ना कोणालाही सेलिब्रिटी असल्याचे वाटू देतात.”
India Wale bhi yaar,
Kisiko bhi celebrity feel karva dete hai😅— Pritam Pandey ✌️ (@ViratFan100) October 7, 2023
एकाने असेही लिहिले की, “रबाडाचे अभिमानी वडील.”
Proud Father of Rabada
— anees ur rehman (@an33s) October 7, 2023
याव्यतिरिक्त एकाने असेही लिहिले की, “रबाडाचे वडील बी लाईक- “सर्वांना फोटो मिळेल. कुणीही धक्काबुक्की करणार नाही.”
Rabada's Father be like,
Sabko photo milegi, koi dhakka mukki nai karega😎😳
— Pritam Pandey ✌️ (@ViratFan100) October 7, 2023
रबाडाची सामन्यातील कामगिरी
रबाडा याने श्रीलंकेविरद्धच्या सामन्यात उच्च दर्जाची गोलंदाजी केली. त्याने सामन्यात 7.5 षटके गोलंदाजी करताना 50 धावा खर्च केल्या. तसेच, 2 विकेट्स आपल्या नावावर केल्या. (fans took selfie with Selfie With Kagiso Rabada’s Father Video see video)
हेही वाचा-
फटाका मॅच! SA vs SL सामन्यात विश्वविक्रमांचे मनोरे, इतिहासात पहिल्यांदाच पाहायला मिळाले ‘हे’ Records
श्रीलंकेच्या नांग्या 102 धावांनी ठेचल्यानंतर बावुमाची सर्वात मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘आम्हाला…’