पहिल्यांदाच आयोजित होत असलेल्या वुमेन्स प्रिमियर लीग या स्पर्धेचा लिलाव सोमवारी (13 फेब्रुवारी) पार पडला. मुंबई येथे झालेल्या लिलावात भारतीय तसेच विदेशी खेळाडूंवर मोठ्या बोल्या लागताना दिसल्या. भारतीय संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना हिला 3 कोटी 40 लाखांची बोली लावून रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. तिला ही मोठी रक्कम मिळाल्यानंतर आता पाकिस्तान पुरुष क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम हा ट्रोल होऊ लागला आहे.
वुमेन्स प्रीमियर लीगच्या या पहिल्या लिलावात पहिलेच नाव स्मृती मंधाना हिचे आले. मुंबई इंडियन्सनै तिच्यावर बोली लावण्यास सुरुवात केली. त्यानंतर मुंबई व आरसीबी यांच्यामध्ये तिला आपला संघात घेण्यासाठी मोठी रस्सीखेच झाली. अखेरीस आरसीबीने तिला आपल्याकडे राखण्यात यश मिळवले. तिच या संपूर्ण लिलावात सर्वात महागडी खेळाडू ठरली.
स्मृतीला ही रक्कम मिळाल्यानंतर पाकिस्तान पुरुष संघाचा कर्णधार बाबर आझम ट्रोल झाला. कारण त्याला पाकिस्तान सुपर लीग खेळण्यासाठी भारतीय रुपयात केवळ 2 कोटी 30 लाख रुपये मिळतात. त्यामुळे सोशल मीडियावर अनेक चाहत्यांनी त्याला ट्रोल केले. एका चाहत्याने लिहिले,
https://twitter.com/SunnyYa67011052/status/1625085863297429504?t=JIQbOcMcb3CmqL1ak2NwLw&s=19
‘स्मृतीला मिळणारी रक्कम आणि बाबरला मिळणारी रक्कम पाहा. आणि यांना आयपीएलसोबत पीएसएलची बरोबरी करायची आहे.’
Babar Azam and other Pakistani players while watching this Auction.#WPLAuction #WomensIPL pic.twitter.com/RAlP4rSgeD
— Jai Updhyay (@jay_upadhyay14) February 13, 2023
अन्य एका हँडलवरून एक मीम शेअर करून लिहण्यात आले की, अरे इतके पण पैसे असतात?
पाकिस्तानी क्रिकेट बोर्ड व पाकिस्तानी चाहते अनेकदा पीएसएल व आयपीएलची बरोबरी करताना दिसतात. मात्र, आता भारताच्या महिला खेळाडूंना ही पाकिस्तानच्या पुरुष क्रिकेटपटूंपेक्षा जास्त पैसे मिळत असल्याने, त्यांना आता ट्रोल केले जाऊ लागले आहे.
(Fans Troll Babar Azam After Smriti Mandhana Get Whopping 3 Crore 40 Lakhs In WPL)






