इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या न्यूझीलंड संघाला इंग्लंड संघाविरुद्ध ३ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. त्यातील पहिला कसोटी सामना नुकताच पार पडला. या सामन्यात हातचा विजय गमावत न्यूझीलंडला इंग्लंडविरुद्ध ५ विकेट्सने पराभूत व्हावे लागले. यादरम्यान इंग्लंडचा माजी कर्णधार जो रुट याची बॅट चांगलीच तळपली. त्याने या सामन्यात नाबाद ११५ धावांची खेळी करत आपले शतक झळकावले. यासोबतच त्याच्या कसोटी क्रिकेटमधील १० हजार धावांचा टप्पाही पार झाला. यानंतर त्याच्यावर क्रीडाविश्वातून कौतुकाचा वर्षाव झाला. यामध्ये बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनीही त्याचे गुणगान गायले. मात्र, चाहत्यांना कुठेतरी गांगुलींचे हे वागणे पटले नाही. त्यामुळे चाहत्यांनी गांगुलींना ट्रोल करण्यास सुरुवात केली.
खरं तर, जो रुट (Joe Root) कसोटी क्रिकेटच्या इतिहासात १० हजार धावांचा आकडा पार करणारा जगातील १४वा खेळाडू ठरला आहे. त्याच्या या यशासाठी अनेक आजी-माजी खेळाडू त्याचे अभिनंदन करत आहेत. मात्र, सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी केलेले रुटचे अभिनंतर चाहत्यांना पचले नाही. गांगुली यांनी ट्वीट करत लिहिले होते की, “जो रुट, काय खेळाडू आहे, दबावातही काय खेळी खेळलाय. एक सार्वकालिन महान खेळाडू.” यामध्ये गांगुली यांनी बीसीसीआय आणि आयसीसीलाही टॅग केले होते.
Joe Roooooooot ..what a player what a knock under pressure ..an all time great ..@bcci @icc
— Sourav Ganguly (@SGanguly99) June 5, 2022
हेही वाचा- रुटच्या सेंच्युरीवर ‘दादा’ही फिदा, गौरवोद्गार काढत म्हणाला, ‘काय खेळाडू आहे, दबावातही चमकलाय’
त्यांचे हे ट्वीट व्हायरल होताच भारतीय चाहत्यांनी त्यांना सोशल मीडियावर जोरदार ट्रोल करण्यास सुरुवात केली. यादरम्यान एका चाहत्याने लिहिले की, “जो रूट आता बीसीसीआयचा खेळाडू झाला आहे असे दिसते. त्याला रोहित आणि राहुलसोबत खेळताना पाहण्यासाठी मी थांबू शकत नाही.”
Arre waah Joe Root is now a bcci player ????. Can't wait to see him playing with Rohit and Rahul two very good back foot players. England steals players from other countries, this time bcci stole their most important one ???? https://t.co/sBqSi61oCr
— Ben Buckett (Perry's version) (@22ReasonsWhy__) June 5, 2022





