जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023च्या अंतिम सामन्याला बुधवारपासून (दि. 7 जून) सुरुवात झाली. इंग्लंडच्या केनिंग्टन ओव्हल मैदानात या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी समालोचक दिनेश कार्तिक याने खेळपट्टीची झलक दाखवली होती. खेळपट्टी पाहून चाहत्यांच्या भुवया उंचावल्या. खरं तर, खेळपट्टीवर गवत दिसत आहे, ज्याबाबत चाहत्यांना मजेशीर प्रतिक्रियांचा पाऊस पाडला. यादरम्यान एका युजरच्या प्रतिक्रियेला कार्तिकने प्रत्युत्तरही दिले, ज्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याने शेअर केलेल्या फोटोंवर एका युजरने लक्षवेधी कमेंट केली. त्याने लिहिले की, “खेळपट्टीच्या नावावर यांनी गार्डन बनवले आहे.” चाहत्याची ही मजेशीर रिऍक्शन पाहून कार्तिकही स्वत:ला रिप्लाय देण्यापासून रोखू शकला नाही. आता त्याचा रिप्लाय सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
At this point dk can be our hero if he secretly cut those damn grass off at night w a lawn mower. Ye kya garden bna diya hai inhonen pitch k naam p https://t.co/shsAolO8eJ
— Angry penguin loves federer (@aquibalam1) June 6, 2023
कार्तिकने ट्वीट करत लिहिले की, “रेझ्युमे आधीच अनेक भूमिकांमुळे वजनदार आहे.” या ट्वीटमध्ये त्याने हसणाऱ्या इमोजीचाही वापर केला आहे
The resume is already heavy with many roles ???????? https://t.co/fnjePrn4P0
— DK (@DineshKarthik) June 6, 2023
खरं तर, कार्तिक समालोचक म्हणून इंग्लंडला गेला आहे. तिथे तो समालोचन करतानाही दिसणार आहे. कार्तिकव्यतिरिक्त डब्ल्यूटीसी अंतिम (WTC Final) सामन्यासाठी अनेक समालोचक इंग्लंडमध्ये आहेत. त्यामध्ये रवी शास्त्री, रिकी पाँटिंग, सुनील गावसकर, मॅथ्यू हेडन, नासिर हुसेन, कुमार संगकारा, हर्षा भोगले, एलिसन मिशेल आणि जस्टीन लँगर या दिग्गजांचा समावेश आहे.
ओव्हल मैदानातील भारताची आकडेवारी
खरं तर, भारतीय संघाने केनिंग्टन ओव्हल (Kennington Oval) मैदानात 14 कसोटी सामने खेळले आहेत. यापैकी 2 सामन्यात भारताला विजय मिळाला आहे, तर 5 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. तसेच, उर्वरित 7 सामने अनिर्णित राहिले आहेत. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाने या मैदानावर 38 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये 7 कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया विजयी झाला आहे. 17 सामन्यात ऑस्ट्रेलियाने पराभव पत्करला आहे, तर 14 सामने अनिर्णित राहिले आहेत.
डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, श्रीकर भारत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया संघ
डेविड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅब्यूशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅविस हेड, कॅमरून ग्रीन, ऍलेक्स कॅरे (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लायन, स्कॉट बोलँड (fans were blown away after seeing the pitch of the oval dinesh karthik gave a funny answer know here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
WTC Finalमध्ये टॉवेल गुंडाळून का फिरत होता शमी? दिग्गज गोलंदाजाचा मोठा खुलासा
अर्रर्र! तोंडघशी पडता पडता वाचला रोहित शर्मा; नेटकरीही म्हणाले, ‘…आणि हा भारतीय संघ सांभाळतोय…’