भारतीय कसोटी संघाची ‘न्यू वॉल’ म्हणून ओळखला जाणारा चेतेश्वर पुजारा आज भारताकडून ५०वा कसोटी सामना खेळत आहे. हा सामना खऱ्या अर्थाने पुजाराने अविस्मरणीय केला आहे. त्याने या सामन्यात आज आधी ४००० धावा पूर्ण केल्या आहेत तर आता त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील तेरावे शतक लगावले आहे.
पुजाऱ्याच्या नावावर सध्या ५० कसोटीमध्ये ५२.१८च्या सरासरीने ४०६३ धावा आहेत. त्यात त्याने १३ शतके आणि १५ अर्धशतके केली आहेत.
चेतेश्वर पुजारने २०१० साली ९ ऑक्टोबर रोजी बेंगलोर येथे कसोटी पदार्पण केले होते. एमएस धोनीच्या नेतृत्वखालील खेळल्या गेलेल्या या सामन्यात त्याने पहिल्या डावात ४ तर दुसऱ्या डावात ७२ धावा केल्या होत्या.