पुणे। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामात मंगळवारी (दि. १२ एप्रिल) चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ आमने- सामने येणार आहे. हंगामातील हा २२वा सामना असून मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील. क्रिकेट अकादमी स्टेडिअम येथे होणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होणार आहे. तसेच, त्याआधी ७ वाजता नाणेफेक होईल. या सामन्यासाठी कशी ड्रीम ११ असू शकते हे पाहू.
तब्बल ४ वेळा आयपीएलचा किताब आपल्या नावावर केलेल्या चेन्नई सुपर किंग्ससाठी (Chennai Super Kings) आयपीएल २०२२ची (IPL 2022) सुरूवात खूपच निराशाजनक राहिली आहे. सीएसकेने आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच हंगामातील पहिले ४ सामने गमावले आहेत. अशात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला (Royal Challengers Bangalore) पराभूत करून सीएसके त्यांचा पहिला विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असेल. दुसरीकडे आरसीबीचा विचार केला, तर त्यांनी पहिल्या चार सामन्यांपैकी ३ सामन्यात विजय आणि एकात पराभव पत्करला आहे.
असा असू शकतो चेन्नई सुपर किंग्सचा संभावित संघ
सीएसकेच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल (CSK Predicted Playing XI) बोलायचं झालं, संघात फारसा बदल पाहण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे डावाची सुरुवात रॉबिन उथप्पा आणि ऋतुराज गायकवाड करू शकतात. तसेच, मधल्या फळीत मोईन अली, अंबाती रायुडू आणि शिवम दुबे खेळू शकतात. याव्यतिरिक्त अष्टपैलू म्हणून रवींद्र जडेजा संघाला मजबूती देऊ शकतो. यष्टीरक्षक म्हणून संघात एमएस धोनी मोठा खेळाडू आहे. दुसरीकडे गोलंदाजी विभागाची जबाबदारी ड्वेन ब्रावो, ख्रिस जॉर्डन महीश तीक्षणा आणि मुकेश चौधरी यांच्याकडे आहे. यांना अली, दुबे आणि जडेजा गोलंदाजीत मदत करू शकतात.
चेन्नई सुपर किंग्सचा संभावित संघ- रॉबिन उथप्पा, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, अंबाती रायुडू, शिवम दुबे, रवींद्र जडेजा (कर्णधार), एमएस धोनी (यष्टीरक्षक), ड्वेन ब्रावो, ख्रिस जॉर्डन, महीश तीक्षणा आणि मुकेश चौधरी.
असा असू शकतो रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा संभावित संघ
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाच्या प्लेइंग इलेव्हनबाबत (RCB Predicted Playing XI) बोलायचं झालं, तर संघात फारसा बदल होण्याची शक्यता दिसत नाही. कारण, मागच्या सामन्यात आरसीबीने फक्त एक बदल केला होता. तो म्हणजे, ग्लेन मॅक्सवेलच्या रूपात. कर्णधार फाफ डू प्लेसिस अनुज रावतसह सलामीला उतरू शकतो. तसेच, मधल्या फळीत विराट कोहली, डेविड विली आणि अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल यांना मधली फळी सांभाळावी लागेल. तसेच, यांना यष्टीरक्षक दिनेश कार्तिकही साथ देऊ शकतो. दुसरीकडे शाहबाज अहमद, वनिंदू हसरंगा, मोहम्मद सिराज आणि आकाश दीप यांच्यावर गोलंदाजीची जबाबदारी असू शकेल.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (संभावित प्लेइंग इलेव्हन)–
फाफ डू प्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), डेविड विली, शाहबाज अहमद, वनिंदू हसरंगा, हर्षल पटेल\जोश हेजलवुड, आकाश दीप, आणि मोहम्मद सिराज.
अशी असू शकते ड्रीम ११
चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (CSK vs RCB) संघात होणाऱ्या सामन्यातील ड्रीम ११बद्दल (Dream XI) विचार करायचा झाल्यास यष्टीरक्षक म्हणून अनुज रावत आणि दिनेश कार्तिकला संधी दिली जाऊ शकते. फलंदाजीत विराट कोहली, फाफ डू प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल आणि रॉबिन उथप्पा यांच्यावर विश्वास ठेवून संघात संधी देऊ शकता. अष्टपैलू म्हणून रवींद्र जडेजा आणि वानिंदू हसरंगाला ड्रीम इलेव्हनमध्ये खेळवू शकता. याव्यतिरिक्त गोलंदाजीत मोहम्मद सिराज, ड्वेन ब्रावो आणि मुकेश चौधरी हे चांगल्याप्रकारे ड्रीम ११ मध्ये फिट बसू शकतात. यापैकी फॉर्ममध्ये असलेल्या फाफला तुम्ही कर्णधार करून पैसे वसूल शकता. तसेच ग्लेन मॅक्सवेलला उपकर्णधार करू शकता.
असा बनवू शकतो ड्रीम ११-
कर्णधार – फाफ डू प्लेसिस
उपकर्णधार – ग्लेन मॅक्सवेल
यष्टीरक्षक – दिनेश कार्तिक, अनुज रावत
फलंदाज – विराट कोहली, फाफ डू प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल, रॉबिन उथप्पा
अष्टपैलू – वानिंदू हसरंगा, रवींद्र जडेजा
गोलंदाज – मोहम्मद सिराज, ड्वेन ब्रावो, मुकेश चौधरी
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
व्याजासकट परतफेड! उमरानने १४०kph वेगाचा चेंडू मारला, चिडलेल्या हार्दिकनेही दिले भारी प्रत्युत्तर
अरेरे! हार्दिकने मोडला स्वत:चाच विक्रम, हैदराबादविरुद्ध ‘कासवा’सारखा खेळत नकोसा विक्रम नावावर
वॉट अ कॅच! खतरनाक शुभमनला आऊट करण्यासाठी त्रिपाठीचा हवेत सूर मारत एकहाती झेल- Video