भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग सध्या चांगलाच चर्चेत आहे. भारताचा श्रीलंका दौरा चांगलाच यशस्वी होताना दिसतो आहे. कसोटी मालिकेत ३-० विजय मिळवत भारताने ते सिद्ध ही करून दाखवलं आहे.
काही दिवसांपूर्वी श्रीलंका विरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली. या यादीत २ अपेक्षित नावे सुरेश रैना आणि युवराज सिंग दिसली नाहीत. या पार्श्वभूमीवर अनेक वाद आणि चर्चांना उधाण आले. सोशल मिडियावर लोकांनी संघाव्यस्थापनावर चांगलेच ताशेरे ओढले.
युवराज सिंगचे वडील योगराज सिंग हे कायमच अश्यावेळी चर्चेत येतात जेव्हा संघाची घोषणा किंवा काही महत्वाच्या घडामोडी अपॆशीत असतात. योगराज सिंग याआधी भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीवर चांगलेच रुसले होते. जेव्हा युवराजला काही काळ संघात घेतले गेले नव्हते तेव्हा त्यांनी धोनीवर चांगलीच टीका केली होती.
आता योगराज सिंग पुन्हा याच मार्गावर आहेत. त्यांनी नुकतीच विराट कोहली आणि एम एस धोनीवर टीकेची धार चढवली आहे. त्यांच्या मते धोनी आणि विराट हे कायम संघ आपल्या मर्जीप्रमाणे बदलतात त्यामुळे युवराजला संघात संधी मिळाली नाही.
आता या पार्श्वभूमीवर युवराज आणि विराट कोहलीला काय म्हणायचे आहे ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल.