भारतीय संघ जुलै महिन्यात वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारताला दोन कसोटी, तीन वनडे आणि पाच टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळायचे आहेत. दौऱ्यात सुरुवातील कसोटी आणि वनडे मालिका खेळली जाणार आहे. अशात बीसीसीआयने शुक्रवारी (23 जून) वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी कसोटी आणि वनडे संघाची घोषणा केली. या दोन्ही संघांमध्ये वेगवान गोलंदाज मुकेश कुमार याला संधी मिळाली आहे. यापूर्वी देखील भारतीय संघाचा भाग राहिलेला मुकेश यावेळी मात्र पदार्पण करू शकतो.
उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज असलेल्या मुकेश याला या वर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत भारतीय संघात संधी मिळालेली. मात्र, त्याला पदार्पण करता आले नव्हते. त्यानंतर झालेल्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळताना त्याने महत्त्वाची षटके टाकताना सर्वांची मने जिंकली. नुकत्याच संपलेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी भारताच्या स्टॅन्ड बाय खेळाडूंमध्ये त्याचा समावेश होता.
मुकेश देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगालचे प्रतिनिधित्व करतो. याशिवाय भारत अ तसेच शेष भारत या संघांचे देखील प्रतिनिधित्व त्याने केले आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील त्याच्या कामगिरीवर नजर टाकल्यास दिसून येईल की, त्याने कशा प्रकारची कामगिरी केली आहे. त्याने आतापर्यंत 39 प्रथमश्रेणी सामने खेळताना 149 बळी आपल्या नावे केले आहेत. त्यासोबतच लिस्ट ए क्रिकेटमध्ये 24 सामने खेळताना त्याने 26 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला आहे. याव्यतिरिक्त टी20 मध्ये 32 बळी त्याच्या नावे आहेत.
मुकेश हा चेंडू दोन्ही बाजूला चांगल्या प्रकारे स्विंग करू शकतो. त्यामुळे त्याचा भारतीय संघाला फायदा होईल. मोहम्मद शमी याला या मालिकेसाठी विश्रांती दिली आहे. त्यामुळे मुकेश याला आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याची संधी असेल.
(Fast Bowler Mukesh Kumar Include In Team India For West Indies Tour)
महत्वाच्या बातम्या –
मोठी बातमी: ‘अजिंक्य’ रहाणे पुन्हा बनला टीम इंडियाचा उपकर्णधार, दीड वर्षानंतर पुनरागमन करताच मिळाली जबाबदारी
VIDEO । एलिस पेरीचं हार्टब्रेक! कारकिर्दीतील महत्वाच्या सामन्यात एक रन कमी पडल्याने हुकल शतक