---Advertisement---

राजस्थानच्या खेळाडूकडून रहस्याचा उलगडा, म्हणाला, ‘या’ गोष्टीमुळे संघ सातत्याने होतोय विजयी

On: सोमवार, एप्रिल 17, 2023 7:13 PM
Rajasthan-Royals
---Advertisement---

इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत 4 संघ वगळता इतर सर्व संघांनी प्रत्येकी 5 सामने खेळले आहेत. या पाच सामन्यांनंतर सर्वाधिक 8 गुणांसह राजस्थान रॉयल्स संघ गुणतालिकेत अव्वलस्थानी कायम आहे. राजस्थानने या हंगामात खेळलेल्या पाच सामन्यांपैकी फक्त एक पराभव पत्करत 4 सामन्यात विजयी पताका फडकवला आहे. अशात राजस्थानच्या शानदार खेळीवर वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट याने मोठे विधान केले आहे. ट्रेंट बोल्टने राजस्थानच्या विजयाचे रहस्य सांगितले आहे.

ट्रेंट बोल्टने सांगितले विजयामागील गुपीत
आयपीएल 2023चा 23वा सामना राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाने 3 विकेट्सने जिंकला. या सामन्यानंतर राजस्थानचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट (Trent Boult) याने म्हटले की, फलंदाजी विभागाच्या भूकेमुळे संघाला आयपीएल सामन्यांमध्ये गतविजेत्या गुजरात टायटन्स संघाविरुद्ध रोमांचक विजय मिळवून दिला. गुजरातच्या नवीन गोलंदाजांच्या शानदार गोलंदाजीसमोर राजस्थान एकेवेळी चार विकेट्स गमावत 55 धावांवर संघर्ष करत होता. मात्र, कर्णधार संजू सॅमसन (60) याच्या शानदार खेळीच्या जोरावर आणि शिमरॉन हेटमायर (Shimron Hetmyer) याच्या 56 धावांच्या वादळी खेळीमुळे राजस्थानने गुजरातला पराभवाचा धक्का दिला.

सामन्यानंतर बोल्ट म्हणाला की, “आमच्याकडे काही प्रतिभावान फलंदाज आहेत. मला वाटते की, सकारात्मक गोष्ट ही आहे की, वेगवेगळ्या वेळी खेळाडूंनी त्यांचे भरपूर योगदान दिले आहे. तसेच, आम्ही सामना जिंकण्यासाठी मदत केली आहे. जोस बटलर हा एकमेव खेळाडू आहे, जो धावा करण्यात कमी पडला आहे, पण इतर फलंदाजांच्या भूकेने आम्हाला आव्हान पार करण्यात मदत केली आहे.”

‘या’ खेळाडूंना म्हटले संघाच्या विजयाचा हिरो
विजयाचे श्रेय कुणाला जाते, असा प्रश्न विचारला असता बोल्ट म्हणाला की, “खेळात एक निश्चित क्षण ठरवणे कठीण आहे. मात्र, हे टी20 क्रिकेटचे स्वरूप आहे. तुम्ही कधीही खेळातून बाहेर होत नसता आणि फक्त हा विश्वास ठेवता की, तुम्ही कोठूनही विजय मिळवू शकता. 12 षटकांच्या फिरकी गोलंदाजीत मला वाटले की, त्यांनी खूप चांगली फलंदाजी केली. तसेच, प्रत्येक षटक महत्त्वाचे आहे. मात्र, संदीप शर्माने त्या खेळीत चांगला खेळ दाखवला. 177 धावांचे आव्हान चांगल्या खेळपट्टीवर ठीक होते.”

राजस्थान रॉयल्स संघाचा पुढील सामना 19 एप्रिल रोजी लखनऊ सुपर जायंट्स संघाविरुद्ध जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडिअमवर होणार आहे. हा सामना जिंकत राजस्थान गुणतालिकेतील आपले स्थान आणखी बळकट करण्याचा प्रयत्न करेल. (fast bowler trent boult said different players have stood up at different times for team)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अश्विन बाद झाल्यानंतर ढसाढसा रडली त्याची मुलगी, आईने सावरण्याचा प्रयत्नही केला पण…, व्हिडिओ व्हायरल
‘धोनीसारखा कर्णधार ना कधी झालाय, आणि भविष्यातही…’, भारताच्या माजी दिग्गजाने बांधले कौतुकाचे पूल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---