इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात ऍशेस मालिका 2023मधील तिसरा कसोटी सामना लीड्स येथील हेडिंग्ले मैदानावर पार पडला. हा सामना इंग्लंडने 3 विकेट्सने आपल्या नावावर केला. तसेच, पहिले दोन सामने गमावल्यानंतर मालिकेत दमदार पुनरागमन केले. यासोबतच इंग्लंडचा विस्फोटक फलंदाज हॅरी ब्रूक याच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली. ब्रूक याने दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावत ही कामगिरी केली. या विक्रमाच्या यादीत त्याने भल्याभल्यांना मागे टाकत अव्वल क्रमांक पटकावला. चला तर त्याच्या विक्रमाविषयी जाणून घेऊयात…
झाले असे की, तिसऱ्या कसोटीत इंग्लंड संघाला विजयासाठी दुसऱ्या डावात 251 धावांचे आव्हान मिळाले होते. इंग्लंडने 7 विकेट्स गमावत 257 धावा केल्या आणि या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करत तिसरा कसोटी सामना जिंकला. इंग्लंडकडून दुसऱ्या डावात हॅरी ब्रूक (Harry Brook) याने 93 चेंडूंचा सामना करताना 75 धावांची खेळी साकारली. यामध्ये 9 चौकारांचा समावेश होता. यासह त्याच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली.
हॅरी ब्रूकचा विक्रम
विशेष म्हणजे, यावेळी 75 धावांची खेळी साकारत कसोटीत हॅरी ब्रूकच्या 1000 धावा पूर्ण (Harry Brook 1000 Test Runs) झाल्या. अशाप्रकारे त्याने कसोटीत वेगवान 1000 धावा करण्याचा विक्रम रचला. तो कसोटी क्रिकेटमध्ये चेंडूंच्या बाबती सर्वात वेगवान 1000 धावा करणारा फलंदाज बनला. त्याने 1058 चेंडूंमध्ये ही कामगिरी फत्ते करून दाखवली.
Keep pushing, Harry ????#EnglandCricket | #Ashes pic.twitter.com/eisaEa92xG
— England Cricket (@englandcricket) July 9, 2023
कसोटीत वेगवान 1000 धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये दुसऱ्या स्थानी न्यूजीलंडचा फलंदाज कॉलिन डी ग्रँडहोम Colin De Grandhomme) आहे. त्याने 1140 चेंडूत 1000 धावा केल्या होत्या. तसेच, तिसऱ्या स्थानी असलेल्या टीम साऊदी (Tim Southee) याने 1167 चेंडूत ही कामगिरी केली होती. तसेच, चौथ्या स्थानी असलेल्या इंग्लंडच्या बेन डकेट याने 1168 चेंडूत 1000 कसोटी धावा केल्या होत्या.
वेगवान कसोटी 1000 धावा (चेंडूंच्या बाबतीत)
1058 – हॅरी ब्रूक (इंग्लंड)*
1140 – कॉलिन डी ग्रँडहोम (न्यूजीलंड)
1167 – टीम साऊदी (न्यूझीलंड)
1168 – बेन डकेट (इंग्लंड)
हॅरी ब्रूकची कारकीर्द
हॅरी ब्रूक याने इंग्लंडकडून आतापर्यंत 10 सामन्यातील 17 डावात फलंदाजी करताना 64.25च्या सरासरीने 1028 धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने 4 शतके आणि 5 अर्धशतकेही झळकावली आहेत. 186 ही त्याची कसोटीतील सर्वोत्तम धावसंख्या आहे. (Fastest to 1000 Test runs harry brook on the top)
महत्वाच्या बातम्या-
श्रीलंका बनली क्वालिफायर्स चॅम्पियन! अंतिम सामन्यात उडवला नेदरलँड्सचा खुर्दा
‘विराट FAB 4चा भाग नाही, बाबरचे नाव जोडा…’, माजी भारतीय क्रिकेटपटूचे खळबळजनक विधान