---Advertisement---

‘विराट FAB 4चा भाग नाही, बाबरचे नाव जोडा…’, माजी भारतीय क्रिकेटपटूचे खळबळजनक विधान

Virat-Kohli
---Advertisement---

भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ माजवणारे वक्तव्य भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा याने केले आहे. आकाश चोप्राने विराट कोहलीबद्दल वक्तव्य केले आहे. त्याने विराटचा अलीकडच्या काळातील फॉर्म पाहता ‘फॅब 4’ विषयी भुवया उंचावणारे वक्तव्य केले आहे. खरं तर, फॅब 4 या श्रेणीत सर्वोत्तम फलंदाज स्टीव्ह स्मिथ, जो रूट, केन विलियम्सन आणि विराट कोहली यांचा समावेश आहे. अशात चोप्राने विराटच्या कामगिरीबद्दल वक्तव्य करून भारतीय क्रिकेटप्रेमींना हैराण केले आहे.

काय म्हणाला चोप्रा?
आपल्या युट्यूब चॅनेलवर बोलताना आकाश चोप्रा (Aakash Chopra) याने म्हटले की, “केन विलियम्सन आणि जो रूट फॅब 4 (Fab 4)मध्ये आहेत. त्यांच्याबाबत काहीच प्रश्न नाही. स्टीव्ह स्मिथ आहे, जो शानदार फलंदाजी करत आहे. त्याने 2020 ते जुलै 2023 दरम्यान 6 शतके ठोकली आहेत. त्याची सरासरी 50च्या आसपास राहिली आहे. त्याच्याविषयीही माझ्या मनात कोणताच प्रश्न नाहीये. मात्र, विराट कोहली आणि डेविड वॉर्नर आता संशयाच्या पिंजऱ्यात आले आहेत. आता फॅब 4 नाही, तर फॅब 3 झाले आहे.”

याव्यतिरिक्त आकाश चोप्राने पुढे बोलताना म्हटले की, “तुम्ही फॅब 4मध्ये बाबर आझमचे नाव जोडू शकता. तुम्ही त्याच्याविषयी विचार करू शकता. मात्र, जर कसोटी क्रिकेटविषयी बोलायचं झालं, तर तो अद्याप यामध्ये सामील होऊ शकत नाही.”

त्याने असेही म्हटले की, “जो रूट, केन विलियम्सन आणि स्टीव्ह स्मिथ तिथे आहेत, पण विराट कोहली आणि वॉर्नर त्या यादीतून बाहेर झाले आहेत. विराट वास्तवात पुनरागमन करू शकतो. मात्र, मी वॉर्नरबाबत निश्चित नाहीये. मला वाटते की, त्याची कसोटी कारकीर्द संपत आहे.”

खरं तर, सध्या भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. आशा व्यक्त केली जात आहे की, कसोटी मालिकेत विराट चांगली फलंदाजी करून आपल्या स्थितीत सुधारणा करण्याचा प्रयत्न करेल. 12 जुलैपासून उभय संघात पहिला कसोटी सामना डॉमिनिका येथे खेळला जाईल. (king virat kohli is not a part of fab 4 this former cricketer makes a stunning claim)

महत्वाच्या बातम्या-
बेअरस्टोसोबत कन्फ्युजन, तरीही हवेत झेप घेत हॅरी ब्रूकने पकडला सुपरमॅन कॅच, तुम्ही पाहिला का?
लो स्कोरिंग मॅचमध्ये चमकली हरमप्रीत कौर! बांगलादेशविरुद्धची पहिली टी-20 मॅच 7 विकेट्सने जिंकली

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---