---Advertisement---

टी20 वर्ल्डकपच्या इतिहासात प्रथमच! ‘ही’ कामगिरी करणारा स्कॉटलंड ठरला पहिलाच संघ

On: सोमवार, फेब्रुवारी 9, 2026 1:18 PM
---Advertisement---

भारत आणि श्रीलंकेत पुरुष संघांचा टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेचा हा दहावा हंगाम असून यामध्ये विक्रमी २० संघ खेळत आहेत. त्यातील सातवा सामना सोमवारी (९ फेब्रुवारी) स्कॉटलंड विरुद्ध ईडली यांच्यात खेळला जात आहे. हा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर खेळला जात असून ईटलीचे हे टी२० विश्वचषकातील पदार्पण आहे. या सामन्यात मोठा इतिहास रचला गेला आहे.

स्पर्धा सुरू होण्याआधी ३०० धावसंख्या होईल अशा चर्चा सुरू होत्या, मात्र चॅम्पियन्स संघांचे २०० धावा करण्यातच घाम निघत होता. आता मात्र भारत, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज किंवा न्यूझीलंडने नाहीतर यंदाच्या हंगामात पहिल्यांदा २००चा आकडा पार करण्याची कामगिरी स्कॉटलंडने केली आहे. त्यांनी ईटलीसमोर विजयासाठी २०८ धावसंख्येचे लक्ष्य ठेवले आहे.

त्याचबरोबर ही धावसंख्या टी२० विश्वचषकाच्या इतिहासातील एखाद्या असोसिएट (सहयोगी) संघाने केलेली सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. तसेच या स्पर्धेत स्कॉटलंड २०० धावसंख्येचा टप्पा गाठणारा पहिलाच असोसिएट संघ ठरला आहे. या सामन्यात नाणेफेक गमावत स्कॉटलंडने प्रथम फलंदाजी केली. त्यांचे सलामीवीर मायकल जोन्स आणि जॉर्ज मुन्से १३.५ षटकातच १२६ धावांची भागीदारी केली. टी२० विश्वचषकात एखाद्या असोसिएट (सहयोगी) संघाच्या खेळाडूंनी सलामीला येत १०० धावांची भागीदारी करण्याची दुसरी वेळ ठरली आहे. यामध्ये मुन्सेने ५४ चेंडूत १३ चौकार आणि दोन षटकारांसह ८४ धावांची खेळी केली.

टी२० विश्वचषकात असोसिएट (सहयोगी) संघामधील १००-हून अधिक धावांची सलामीची भागीदारी पहिल्यांदा आणि विक्रमी ओमानच्या अकिब इल्यास आणि जतिंदर सिंग यांनी केली. त्यांनी २०२१च्या विश्वचषकात पीएनजीविरुद्ध नाबाद १३१ धावांची भागीदारी केली होती.

टी२० विश्वचषकात असोसिएट (सहयोगी) संघांनी केलेल्या सर्वोच्च धावा-
१. २०७/४ – स्कॉटलंड विरुद्ध इटली, कोलकाता, २०२६ (पहिला डाव)*
२. १९७/३ – अमेरिका विरुद्ध कॅनडा, डॅलस, २०२४ (दुसरा डाव)
३. १९४/५ – कॅनडा विरुद्ध अमेरिका, डॅलस, २०२४ (पहिला डाव)
४. १९३/४ – नेदरलँड्स विरुद्ध आयर्लंड, सिलहेट, २०१४ (दुसरा डाव)
५. १८९/४ – आयर्लंड विरुद्ध नेदरलँड्स, सिलहेट, २०१४ (पहिला डाव)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---