---Advertisement---

रणजी ट्रॉफी 2025-26: मुंबईविरुद्ध केएल राहुलचे महत्वपूर्ण शतक, क्वार्टरफाइनलमध्ये कर्नाटक मजबूत स्थितीत

On: सोमवार, फेब्रुवारी 9, 2026 12:37 PM
---Advertisement---

भारतात एकीकडे पुरुष संघांचा टी२० विश्वचषक सुरू असून दुसरीकडे रणजी ट्रॉफीच्या बाद फेरीचे सामने सुरू आहेत. यामध्ये मुंबई विरुद्ध कर्नाटक हा उपांत्यपूर्व फेरीचा चौथा सामना सुरू आहे. हा सामना मुंबईच्या बीकेसी ग्राऊंडवर खेळला जात आहे. यामध्ये केएल राहुलने शतकी खेळी केली आहे.

या सामन्यात मुंबईने कर्नाटकला विजयसाठी ३२५ धावांचे लक्ष्य दिले आहे. अशा क्षणी राहुलने त्याच्या प्रथम श्रेणीच्या कारकिर्दीतील २४वे शतक केले आहे. त्याने ही शतकी खेळी १४७ चेंडूंचा सामना करत पूर्ण केली आहे.
लक्ष्याचा पाठलाग करताना कर्नाटकची सुरूवात निराशाजनक झाली. लयीत असणारा सलामीवीर मंयक अग्रवाल तीन धावा करतच बाद झाला. त्यानंतर कर्णधार देवदत्त पड्डीकलसह राहुलने संघाचा डाव सांभाळला. दोघांनी ८४ धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली.

पड्डीकल ३९ धावा करत तनुष कोटीयनचा शिकार झाला. राहुलने मग रवीचंद्रम स्मरणसोबत संघाचा धावफलक हलता ठेवला आहे. दोघांनी आतापर्यंत १४६ धावांची भागीदारी केली आहे. यामध्ये स्मरण ६४ धावा आणि राहुल १३० धावा करत खेळपट्टीवर उपस्थित आहेत.

या सामन्यात मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकुरने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मुंबईने पहिल्या डावात १२० धावा केल्या. ज्यामध्ये अखिल हेरवाडकरने ६० धावा केल्या. त्याच्याबदल्यात कर्नाटकचा पहिला डाव १७३ धावसंख्येवरच संपुष्टात आला. त्यामध्ये मंयकने ९२ धावा केल्या.

मुंबईने दुसऱ्या डावात चांगली फलंदाजी केली. त्यामध्ये आकाश आनंदने ७० धावांची खेळी केली तर अन्य पाच खेळाडूंनी ३० पेक्षा अधिक धावांची खेळी केली. यामुळे त्यांनी ३७७ धावसंख्या उभारली. कर्नाटक मजबूत स्थितीत असून त्यांनी ३ विकेट्स गमावत २६५ धावा केल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---