Loading...

ना धोनी ना पाँटिंग, कॅप्टन कोहली ठरतोय सगळ्यांनाच भारी!

बंगळुरु। आज(19 जानेवारी) एम चिन्नास्वामी स्टेडियमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात तिसरा आणि निर्णायक कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने एक खास पराक्रम केला आहे.

त्याने वनडेमध्ये कर्णधार म्हणून 5000 धावा पूर्ण केल्या आहेत. वनडेमध्ये तो 5000 धावांचा टप्पा पार करणारा एकूण 8 वा तर भारताचा एकूण 4 था कर्णधार ठरला आहे. याआधी भारताकडून एमएस धोनी, मोहम्मद अझरुद्दीन आणि सौरव गांगुली यांनी हा पराक्रम केला आहे.

तसेच विराटने कर्णधार म्हणून 82 व्या वनडे डावात हा कारनामा केला आहे. त्यामुळे तो वनडेमध्ये सर्वात जलद 5000 धावा करणारा कर्णधार ठरला आहे. त्याने हा कारनामा करताना एमएस धोनीला मागे टाकले आहे. धोनीने 127 वनडे डावात कर्णधार म्हणून 5000 धावा पूर्ण केल्या होत्या.

विशेष म्हणजे वनडेमध्ये कर्णधार म्हणून सर्वात जलद 1000, 2000 , 3000 आणि 4000 धावा करण्याचा विश्वविक्रमही विराटच्याच नावावर आहे.

#वनडेमध्ये सर्वात जलद 5000 धावा करणारे कर्णधार – 

Loading...

82 डाव – विराट कोहली

127 डाव – एमएस धोनी

131 डाव –  रिकी पाँटिंग

135 डाव – ग्रॅमी स्मिथ

Loading...

136 डाव – सौरव गांगुली

#वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय कर्णधार –

6641 धावा – एमएस धोनी

5239 धावा – मोहम्मद अझरुद्दीन

Loading...

5104 धावा – सौरव गांगुली

5000 धावा – विराट कोहली*

You might also like
Loading...