---Advertisement---

बाप तसा बेटा! राहुल द्रविडचा मुलगा समितचा क्रिकेटमध्ये भीमपराक्रम

On: शुक्रवार, डिसेंबर 22, 2023 10:34 AM
Rahul-Dravid-And-Son
---Advertisement---

राहुल द्रविड याचा मुलगा समित द्रविड याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या फलंदाजीने खळबळ उडवून दिली आहे.19 वर्षांखलील कूचबिहार ट्रॉफीमध्ये समितने आपल्या फलंदाजीचा करिष्मा दाखवला असून 159 चेंडूत 98 धावांची खेळी खेळली आहे, ज्यामध्ये या युवा फलंदाजाने 13 चौकार आणि 1 षटकार ठोकला आहे. समितच्या फलंदाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात समितने कर्नाटककडून शानदार खेळी खेळली आणि आपल्या संघाला विजयापर्यंत नेण्यात यश मिळवले. समित शतक झळकावण्यास चुकला असला तरी राहुल द्रविड याच्या मुलाने ज्या संयमाने फलंदाजी केली त्यामुळे त्याच्या भविष्याची आशा निर्माण झाली आहे.

फलंदाजी करताना समित द्रविड (Samit Dravid) याने त्याच शैलीत फलंदाजी केली ज्या शैलीत त्याचे वडील राहुल द्रविड (Rahul Dravid) फलंदाजी करत असत. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये समित कव्हर ड्राईव्ह मारताना दिसत आहे. त्याची कव्हर शॉट्स खेळण्याची शैली अगदी त्याचे वडील राहुल द्रविडसारखी आहे. समितची फलंदाजी पाहून सोशल मीडियावर क्रिकेट चाहते त्याला दुसरा द्रविड म्हणू लागले आहेत आणि ‘मुलगा खूप नाव कमवेल’ असंही म्हणत आहेत.

समितच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर कर्नाटक संघ हा सामना एक डाव आणि 130 धावांनी जिंकण्यात यशस्वी ठरला, तर गोलंदाजी करताना समितने 2 विकेट्स घेतल्या. या सामन्यात समित व्यतिरिक्त, कार्तिकेयने 175 चेंडूत 21 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 163 धावा केल्या, ज्याच्या जोरावर कर्नाटकने 84 षटकात 5 बाद 480 धावा केल्या, त्यानंतर जम्मू-काश्मीर संघाला केवळ 170 धावा करता आल्या. (Father like son Rahul Dravid’s son Samit’s feat in cricket)

हेही वाचा

राहुलच्या नेतृत्वात घडला इतिहास, तिसऱ्या वनडेत विजय मिळवत मालिका भारताच्या खिशात
बॉलिवूडचा अभिनेता कार्तिक आर्यन सोनी स्पोर्ट्स नेटवर्कचा फुटबॉल ब्रॅंड अॅम्बेसिडर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---