मुंबई । पाकिस्तान आणि इंग्लंड संघातील दुसरा कसोटी सामना गुरुवारपासून साऊथॅंम्पटनच्या रोझ बाऊल मैदानावर खेळला जात आहे. सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार अझर अलीने इंग्लंडविरुद्ध नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात पाकिस्तानने फवाद आलमच्या रूपात एकमेव बदल केला, तर इंग्लंडने वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला प्लेइंग इलेव्हनमधून वगळले आहे.
इंग्लंडच्या संघाने आर्चरच्या जागी सॅम करनचा समावेश केला, तर कौटुंबिक कारणांमुळे न्यूझीलंडला परतलेल्या बेन स्टोक्सची जागा जॅक क्रॉलेने घेतली आहे. त्यामुळे तो दुसरा आणि तिसरा कसोटी सामना खेळू शकणार नाही. इंग्लंडने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना जिंकला असून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
प्लेइंग इलेव्हनमध्ये पाकिस्तानने फक्त एकच बदल केला. त्यांनी शादाब खानच्या जागी फवाद आलमचा समावेश केला. 2009 नंतर प्रथमच फवादला पाकिस्तानच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले आहे. न्यूझीलंडविरुद्ध त्याने शेवटची कसोटी डब्लिनमध्ये खेळली होती. त्यानंतर तो संघातून बाहेर पडला होता.
यादरम्यान, पाकिस्तानने 11 वर्षात 88 कसोटी सामने खेळले आहेत, जे पाकिस्तानकडून खेळणार्या कोणत्याही खेळाडूंच्या दोन सामन्यांमधील दुसरे सर्वात मोठे अंंतर आहे. 1969 मध्ये खेळल्यानंतर 1987 मध्ये खेळलेल्या युनूस अहमदच्या नावावर हा अनपेक्षित विक्रम आहे. या वर्षांत पाकिस्तानने 104 कसोटी सामने खेळले.
34 वर्षीय फवादने पाकिस्तान संघाकडून 4 कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याच्या नावावर एक शतकासह 250 धावांची नोंद आहे. कसोटीत त्याची 35.71 सरासरी आहे. यासोबत त्याने 38 वनडे सामन्यात 40.25 च्या सरासरीने 966 धावा केल्या आहेत.
पाकिस्तानी खेळाडूच्या दोन कसोटी दरम्यानचा फरक
104 कसोटी – युनूस अहमद (1969-87)
88 कसोटी- फवाद आलम (2009-20) *
65 कसोटी – शाहिद नजीर (1999-06)
54 कसोटी – मंजूर इलाही (1987-95)
महत्त्वाच्या बातम्या-
-‘मला संघातून वगळण्याचा निर्णय योग्यच होता,’ ४१ शतके ठोकणाऱ्या खेळाडूने केले मोठे वक्तव्य
-इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत पाकिस्तानचा ‘हा’ खेळाडू झाला जखमी; तरीही ठोकले अर्धशतक
ट्रेंडिंग लेख–
-१९९०मध्ये आयपीएल झाली असती तर हे खेळाडू झाले असते मालामाल
-या महान खेळाडूने सरळ सांगतिले, डीकाॅक नाही होऊ शकत दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार
-भारताचे ५ डावखुरे महान फलंदाज, ज्यांनी रचला आहे क्रिकेटमध्ये इतिहास