पाकिस्तान संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर न्यूझीलंड ‘अ’ आणि पाकिस्तान ‘अ’ संघात १७ डिसेंबर ते २० डिसेंबर दरम्यान अनधिकृत कसोटी सामना खेळवण्यात आला. या सामन्यातील पहिल्या डावात पिछाडीवर असलेल्या पाकिस्तान ‘अ’ने दुसऱ्या डावात जबरदस्त पुनरागमन केले आणि ८९ धावांनी सामना खिशात घातला. पाकिस्तान ‘अ’च्या विजयात फलंदाज फवाद आलमच्या शतकी खेळीचा मोठा वाटा राहिला. परंतु सोशल मीडियावर फवादच्या तुफानी शतकापेक्षा जास्त दुसऱ्याच एका गोष्टीची चर्चा रंगली आहे.
खरं तर फवाद हा डावखुरा फलंदाज आहे. तो फलंदाजी करताना दोन्ही पायामध्ये मोठे अंतर सोडून विचित्र पद्धतीने थांबतो. सोबतच तो दोन्ही पायाच्या मध्यभागी बॅट ठेवून शॉट मारतो. त्याच्या या विचित्र फलंदाजी शैलीमुळेच सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा होत आहे. त्याच्या विचित्र पद्धतीने फलंदाजी करण्याच्या शैलीचे फोटो आणि व्हिडिओही सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल होत आहेत.
100! for Fawad Alam against NZA when other top five batsman were dismissed for 54 runs combine. #Pakistan #FawadAlam #Shaheen #PAKvNZ pic.twitter.com/8eWXYtktQP
— HumRO 🍥 (@humro66) December 19, 2020
Fawad Alam😊 has just scored a brilliant Hundred points symbol against New Zealand A😍
Pakistan Shaheen in command now, the pair of Fawad and Rohail has piled up runs on Day 3 🥰
Pakistan Shaheens lead by 219 Runs #PAKvNZ #PCB #Shaheens #BacktheBoysInGreen #Fawadalam pic.twitter.com/vfIBropiVF— Atif Javed🧔‼ (@atiikekhayalat) December 19, 2020
शतक ठोकत संघाला जिंकून दिला सामना
पाकिस्तान ‘अ’कडून पहिल्या डावात फलंदाजी करताना फवाद केवळ ३ धावांवर बाद झाला. एडी नटल आणि नाथन स्मिथ यांनी मिळून त्याला झेलबाद केले. परंतु दुसऱ्या डावात त्याने न्यूझीलंड ‘अ’च्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. दुसऱ्या डावात त्याने ५९.६६च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत १३९ धावांची अफलातून शतकी खेळी केली. दरम्यान त्याने ११ चौकारही ठोकले. ही त्या पूर्ण सामन्यात कोणत्याही फलंदाजाने केलेली सर्वोच्च धावसंख्या होती.
सामन्याचा थोडक्यात आढावा
पाकिस्तान ‘अ’ आणि न्यूझीलंड ‘अ’ यांच्यात झालेल्या अनधिकृत कसोटी सामन्यात पाकिस्तान ‘अ’ने प्रथम फलंदाजी केली. सलामीवीर फलंदाज अझहर अलीच्या अर्धशतकी खेळीमुळे पाकिस्तान ‘अ’ने पहिल्या डावात १९४ धावांचा आकडा गाठला. इतर फलंदाज मोठी आकडी धावसंख्या करू शकले नाहीत. न्यूझीलंड ‘अ’ कडून गोलंदाजी करताना एडी नटलने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंड अने २२६ धावा करत पहिल्या डावात ३२ धावांची आघाडी मिळवली. रचिन रवींद्र याच्या ७० धावा आणि कॅम फ्लेचर याच्या ५७ धावांमुळे न्यूझीलंड ‘अ’ला २२६ धावांची धावसंख्या गाठता आली.
त्यानंतर पाकिस्तान ‘अ’ने दुसऱ्या डावात दमदार पुनरागमन केले. फवाद आलम (१३९ धावा) आणि कर्णधार रोहेल नजीर (१०० धावा) यांच्या शतकी खेळीमुळे पाकिस्तानने ३२६ धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंड ‘अ’चा एकही फलंदाज ५०पेक्षा जास्त धावा करू शकला नाही आणि २०८ धावांवर त्यांचा दुसरा डाव संपला. अशाप्रकारे पाकिस्तान ‘अ’ने ८९ धावांच्या फरकाने सामना जिंकला.
महत्त्वाच्या बातम्या-
द्रविड भारतीय फलंदाजांच्या मदतीसाठी ऑस्ट्रेलियाला जाणार? राजीव शुक्लांनी दिले ‘हे’ उत्तर
भाई साहब इतनी अंग्रेजी! कैफच्या ‘त्या’ ट्विटवर हरभजनची मजेदार कमेंट
‘द वॉल’च्या तालमीत क्रिकेटचे धडे गिरवणारा ‘हा’ पठ्ठ्या असेल भारताची ‘सलामी’ तोफ; लवकरच होणार पदार्पण