पुणे। येथील श्री शिवछत्रपती स्पोर्टस कॉम्प्लेक्स, म्हाळुंगे, बालेवाडी स्टेडिअमवर आज एफसी पुणे सिटी विरुद्ध दिल्ली डायनामोज एफसी मध्ये आयएसएल स्पर्धेचा सामना रंगणार आहे.
या स्पर्धेतील यावर्षीचा एफ सी पुणे सिटी आणि दिल्ली डायनामोज एफ सी संघांचा हा पहिलाच सामना आहे. पुणे संघ घराच्या मैदानावर खेळत असल्याने ते स्पर्धेची सुरवात विजयाने करण्याचा प्रयत्न करतील.
आत्तापर्यंत आयएसएल स्पर्धेच्या इतिहासात ६ वेळा हे दोन्हीही संघ आमने सामने आले आहेत. यात एफसी पुणे सिटीने दिल्ली डायनामोजवर एकदाच विजय मिळवला आहे.
How is @FCPuneCity's @MarcosTebar6 preparing to face his former club @DelhiDynamos tonight?
Watch to find out!#LetsFootball #PUNDEL pic.twitter.com/8Jod5JOl0L
— Indian Super League (@IndSuperLeague) November 22, 2017
मागील वर्षीच्या या स्पर्धेत सर्वाधिक गुण मिळवणारा मार्सलीनहो आणि नॉर्थइस्ट युनिटेडचा फोरवॊर्डला खेळणारा एमिलीयानो अल्फारो यांच्या सहभागामुळे पुण्याचा संघ यावर्षी मजबूत वाटत आहे.
तसेच रेन्को पोपोविक यांचादेखील हा एफ सी पुणे सिटी संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून पहिलाच सामना असणार आहे.
Here we go! 🔥 #OrangeArmy #FCPC #LetsFootball pic.twitter.com/z2gVOuCaA1
— Orange Army (@OrangeArmyPune) November 22, 2017