पुणे | राजेश वाधवान समूह आणि बॉलिवूड स्टार अर्जुन कपूर यांच्या सहमालकीच्या इंडियन सुपर लीग टीम असलेल्या एफसी पुणे सिटी संघाने विंगर गब्रीएल फर्नांडीस आणि बचावात्मक मध्यरक्षक शंकर संपिंगीराज यांची 2018-19 या मौसमासाठी संघात समावेश केला आहे.
एफसी पुणे सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव मोडवेल म्हणाले कि, गब्रीएल आय लीग मध्ये इस्ट बंगाल संघाचे प्रतिनिधित्व केले होते. दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर त्याने एफसी पुणे सिटी संघाकडून इंडियन सुपर लीग मध्ये प्रवेश केला आहे. गब्रीएल हा त्याच्या वेग आणि चपळाईमुळे संघाला एक चांगला पर्याय मिळाला आहे. त्यांचा सरळ खेळ व तिक्ष्णता उत्तम आहे. त्याच्याकडे क्षमता आहे की तो संघासाठी उत्कृष्ट खेळाडू ठरेल.
गब्रीएलने आपल्या कारकिर्दिची सुरूवात डेंपो व आणि स्पोर्टींग गोवा या संघांकडून केली. 2012 मध्ये मुंबई एफसी संघात त्याने प्रवेश घेतला. वयाच्या 30व्या वर्षी 2014 साली एफसी गोवा संघाकडून आयएसएल मध्ये त्यांने प्रवेश केला आणि त्यानंतर मुंबई सिटी एफसी संघाकडून तो खेळला. गब्रीएलने आय लीग स्पर्धेमध्ये सालगावकर, चर्चिल ब्रोज् आणि इस्ट बंगाल संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
23 वर्षाखालील राष्ट्रीय संघासाठी बेंगळुरू एफसी संघाकडून प्रभावी कामगिरी केल्यानंतर शंकरने एफसी पुणे सिटी संघामध्ये प्रवेश केला. कर्नाटक येथे जन्मलेल्या शंकरने आपल्या कारर्किदीची सुरूवात एचएएल मधुन केली आणि डीएसके शिवाजीयन्स् संघात लोन वर खेळला. गौरव मोडवेल म्हणाले कि, शंकर हा कष्टाळू खेळाडू आहे. बॉल बरोबर तो अत्यांत तांत्रीकदृष्ट्या खेळ करतो. त्यांच्यामध्ये फुटबॉल खेळातील अनेक गुण आहेत. याचबरोबर तो एक अनुभवी खेळाडूही आहे. मला विश्वास आहे संघाबरोबरचा त्याचा आनुभव उत्तम असेल.
2016 साली बांगलादेश येथे झालेल्या एएफसी 23 वर्षाखालील स्पर्धेत शंकरने उझबेकीस्तान संघा विरोधात भारतीय राष्ट्रीय संघाचे पात्रता फेरीत प्रतिनिधित्व केले होते. शंकर 2015च्या आयएसएल मौसमात केरळा ब्लास्टर्स संघाकडून खेळला होता.
यावेळी गब्रीएल म्हणाला आयएसएल मध्ये एफसी पुणे सिटी संघाकडून खेळण्यास मी उत्सुक आहे. गेल्या मौसमातील संघाची कामगिरी प्रभावी होती. माझ्या संघातील समावेशाचा संघाची कामगिरी अधिक उत्तम करण्यासाठी फायदा होईल यासाठी मी प्रयत्न करेल.
शंकर म्हणाला, एफसी पुणे सिटी संघासोबत हे नविन आव्हान पेलण्यासाठी मी तयार आहे. संघाने गेल्या मौसमात एतिहासीक कामगिरी केली आहे. संघातील समावेशामुळे मी आनंदीत आहे. यामुळे माझ्यासारख्या युवा खेळाडूंना एक चांगले व्यासपीठ मिळाले आहे. संघातील इतर खेळाडूंना भेटण्यासाठी मी उत्सुक आहे. संघाबरोबर ही माझ्या कारकिर्दीची नविन सुरूवात आहे.