पुणे : पुणे व्यापारी महासंघातर्फे आयोजित फेडरेशन प्रीमिअर लीग २०१८ या क्रिकेट स्पर्धेला सोमवारपासून सुरुवात होत आहे. मुकुंदनगर येथील कटारिया हायस्कूलच्या मैदानावर दिनांक ५ ते ११ फेब्रवारीदरम्यान ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेचे यंदा तीसरे वर्ष असून मुख्य प्रायोजक सिस्का एलईडी आणि सहप्रायोजक मराठे ज्वेलर्स, स्टार इंजिनीअर्स आणि सॉलीटेअर आहेत, अशी माहिती पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फतेचंद रांका आणि सचिव महेंद्र पितळीया यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी स्पर्धेचे समन्वयक अभय व्होरा उपस्थित होते.
स्पर्धेत २० संघ सहभागी होणार आहेत. यामध्ये स्टार्स (औंध व्यापारी संघटना), सीएपीडी लाईफसेव्हर्स (केमिस्ट असोसिएशन आॅफ पुणे डिस्ट्रीक्ट), सीएमडीए (कम्प्युटर अॅन्ड मीडिया डिलर्स असोसिएशन), स्टोन स्ट्रायकर्स (मार्बल अॅन्ड टाईल्स असोसिएशन), अटायर स्मॅशर्स ( पुणे जिल्हा होजिअरी, रेडीमेड, हॅन्डलूम डिलर्स असोसिएशन), पाडा वॉरियर्स (पूना आॅटोमोबाईल डिलर्स असोसिएशन), पिआ पॉवर (पूना इलेक्ट्रीक अॅन्ड इलेक्ट्रॉनिक्स् असोसिएशन), प्लायवूड ईलेव्हन (पूना प्लायवूड डिलर्स असोसिएशन), पीसीएमए युनायटेड (पूना कॅम्प मर्चंटस् असोसिएशन),पीसीडब्ल्यूडिए (पुणे कार्पेट अॅन्ड वॉलपेपर डिलर्स असोसिशन), अधेसिव्ह कारीगर (पुणे हार्डवेअर होलसेल डिलर असोसिएशन), सॉलीटेअर इलेव्हन (पुणे सराफ असोसिएशन), स्टेनलेस स्टील आयकॉन (पुणे स्टेनलेस स्टील मर्चंन्ट असोसिएशन),पीटीएसडीए रॉयल्स (पुणे टाइल्स अॅन्ड सॅनिटरीवेअर डिलर्स असोसिएशन), लक्ष्मीरोड रॉयल्स (रिटेल टेक्स्टाइल गारमेंटस् सिंडीकेट),मेटल चॅलेंजर्स (दि ब्रास अॅन्ड कॉपर मर्चंट असोसिएशन), जाफेरानी रॉयल्स इलेव्हन (दि पुणे आयर्न अॅन्ड स्टील मर्चंटस् असोसिएशन), टिंबर इलेव्हन (दि पुणे टिंबर मर्चंटस् अॅन्ड सॉ मिल असोसिएशन), पीसीपीडीए साक्षी ग्रुप (दि पुणे कन्ज्युमर प्रोडक्ट डिस्ट्रीब्युटर असोसिएशन), वेल्ड स्ट्रायकर्स (दि पुणे वेल्डिंग डिलर्स असोसिशन आदी संघ स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
स्पर्धेचे समन्वयक अभय व्होरा म्हणाले, स्पर्धेत एकूण ४७ डे-नाईट सामने होणार आहेत. स्पर्धा साखळी आणि बाद या स्वरूपात होईल. साखळी आणि उपांत्यपूर्व फेरीचे सामने १० षटकांचे, तर उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीचा सामना १२ षटकांचा होणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन दि. ५ फेब्रुवारी रोजी विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी सिस्का एलईडीचे राजेश उत्तमचंदानी, मराठे ज्वेलर्सचे मिलींद मराठे, स्टार इंजिनीअरचे किशोरीलाल रामरायका, सॉलिटेअरचे अतुल चोरडिया उपस्थित राहणार आहेत. तर समारोप दिनांंक ११ फेब्रवारी रोजी सायंकाळी ७ वाजता होणार आहे. विजेत्या संघाला आकर्षक ट्रॉफी तसेच वैयक्तिक पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच वैयक्तिक सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाºया खेळाडूस एलईडी टीव्ही आणि स्पोर्ट्स सायकल देण्यात येणार आहे.
स्पर्धेचे आयोजन अभय वोरा, ब्रिजेन शाह, बक्षीसिंग तलवार, मनोज सारडा, निर्मल शाह, चंदन मुंदडा, संजय खोपडे, कल्पेश शहा, कल्पेश भुतडा, अरविंद कोठारी, सुभाष पोरवाल, मिठालाल जैन, विजय ओसवाल, नितीन पोरवाल, सुनील मेहता, दिपक शाह, नितीन पंडीत, कुमार पोरवाल, गौरव शाह, निशिथ संघवी, विजय राठोड, प्रकाश शहा, अभय गांधी, अमित अगरवाल, निलेश सारडा यांनी केले आहे.