पुणे । लेडी लायन्स संघाने पुणे व्यापारी महासंघातर्फे आयोजित फेडरेशन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेतील महिलांच्या गटात रोडिज इलेव्हन संघावर ६ विकेटनी मात करून विजेतेपद पटकावले. स्पर्धेचे यंदा चौथे वर्ष होते. या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक सिस्का आणि सहप्रायोजक शॉ टोयोटा, गार्नेट बिल्डर्स अँड डेव्हलपर्स हे होते.
मुकुंदनगर येथील कटारिया हायस्कूलच्या मैदानावर ही स्पर्धा झाली. या स्पर्धेतील महिलांच्या अंतिम लढतीत रोडिज इलेव्हन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. रोडिज इलेव्हन संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ७ षटकांत ३ बाद ४२ धावा केल्या. यात सोनल गाडियाने सर्वाधिक १४ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल लेडी लायन्स संघाने ४.४ षटकांत ४ बाद ४३ धावा केल्या. यात सोनाली शहाने नाबाद १६ धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक – रोडिज इलेव्हन – ७ षटकांत ३ बाद ४२ (सोनल गाडिया १४, नर्मता शिंगी १०, सिद्धी शहा १-९, सोनाली शहा १-८, दिशा कोठारी १-२ ) पराभूत वि. लेडी लायन्स – ४.४ षटकांत ४ बाद ४३ (सोनाली शहा नाबाद १६, सिद्धी शहा ११, समता शहा १-२, नर्मता शिंगी १-५).