---Advertisement---

इकडं तरुणीनं प्रपोज केलं अन् तिकडं स्टोक्सनेही दिली स्माईल, लाईव्ह सामन्यात चाहतीच्या पोस्टरने वेधले लक्ष

On: मंगळवार, फेब्रुवारी 28, 2023 4:47 PM
Fan-Girl-of-Ben-Stokes
---Advertisement---

न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड संघात दोन सामन्यांची कसोटी मालिका पार पडली. यातील दुसऱ्या कसोटीचा शेवट मंगळवारी (दि. 28 फेब्रुवारी) वेलिंग्टन येथे झाला. हा कसोटी सामना खूपच रोमांचक पद्धतीने पार पडला. या सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडवर 1 धावेने शानदार विजय साकारला. तसेच, मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. मात्र, दुसऱ्या सामन्याच्या चौथ्या दिवशी असे काहीतरी घडले, ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका तरुणीने मैदानावरील सर्व लोकांचे लक्ष वेधून घेतले. चला तर नेमका किस्सा काय आहे जाणून घेऊयात…

बेन स्टोक्सला तरुणीनं केलं प्रपोज
झालं असं की, न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड (New Zealand vs England) संघातील दुसरा कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाचा खेळ पाहण्यासाठी एक तरुणी बॉयफ्रेंडसोबत आली होती. विशेष म्हणजे, तिने सोबत एक पोस्टरही नेले होते. या पोस्टरवर लिहिले होते की, “बेन, माझा बॉयफ्रेंड इथे क्रिकेट पाहण्यासाठी आला आहे, पण मी तुला पाहण्यासाठी आले आहे.”

https://twitter.com/FlashCric/status/1630036659919286275?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1630036659919286275%7Ctwgr%5Eb4234bcbcfccb07b109d217bd1beae8552b62365%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.sportzwiki.com%2Fcricket%2Ffemale-fan-proposes-to-ben-stokes-at-the-stadium-eng-vs-nz-2nd-test%2F

यावेळी कॅमेरा जसा महिला चाहतीच्या पोस्टरकडे गेला आणि मैदानावरील मोठ्या स्क्रीनवर दिसला. त्यावेळी चाहतीला स्क्रीनवर पाहून बेन स्टोक्स (Ben Stokes) हादेखील हसू लागला. स्टोक्सने ते पोस्टर पाहून आपले डोके हलवले आणि स्माईलही दिली. आता स्टोक्स त्याच्या संघसहकाऱ्यांकडे पाहून डोके हलवत होता की, त्या महिला चाहतीच्या पोस्टरकडे पाहून, याचा खुलासा अद्याप झाला नाहीये.

समालोचनकही पडलेले गोंधळात
दुसरीकडे, महिला चाहतीच्या पोस्टरवर समालोचकांची नजर पडली, तेव्हा ते त्या पोस्टरचे विश्लेषण करू लागले. यादरम्यान एका समालोचकाने विचारले की, “हे बेन कुणासाठी लिहिले आहे. कारण, इंग्लंडच्या अंतिम अकरा खेळाडूंमध्ये तीन बेन आहेत. सलामी फलंदाज बेन डकेट, यष्टीरक्षक फलंदाज बेन फोक्स आणि कर्णधार बेन स्टोक्स आहेत.” परंतु महिला चाहतीच्या पोस्टरवर दुसरे नाव लिहिले नाहीये, ज्यामुळे समालोचक गोंधळात पडले होते.

खरं तर, न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड संघात खेळल्या गेलेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडने विजय मिळवत 1-1 बरोबरी साधली. या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडला विजयासाठी 257 धावांचे आव्हान होते. मात्र, इंग्लंड संघाचा डाव 256 धावांवरच संपुष्टात आला. (female fan proposes to skipper ben stokes at the stadium eng vs nz 2nd test see poster)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘पैसा वसूल सामना, पण आम्ही निराश…’, न्यूझीलंडविरुद्ध 1 धावेने पराभूत होताच कर्णधार स्टोक्सलाही झालं दु:ख
राहुलला उपकर्णधारपदावरून हटवण्याचा अर्थ काय? मौन सोडत रोहित स्पष्टच बोलला, ‘त्याला महत्त्वच देऊ नका’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---