काल (8 फेब्रुवारी) इडन पार्क (Eden Park), ऑकलंड (Auckland) येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात द्विपक्षीय वनडे मालिकेतील दुसरा सामना (2nd ODI Match) पार पडला आहे. हा सामना न्यूझीलंड संघाने 22 धावांनी जिंकला असून मालिकेत 2-0ने विजयी आघाडी घेतली आहे.
तसेच या सामन्यात न्यूझीलंडचा फलंदाज मार्टिन गप्टील (Martin Guptill) आणि रॉस टेलरने (Ross Taylor) एक खास विक्रम केला आहे. गप्टीलने या सामन्यात 79 चेंडूत 79 धावा केल्या आहेत. यामध्ये 3 षटकार आणि 8 चौकारांचा समावेश आहे. तर टेलरने 74 चेंडूत नाबाद 73 धावांची खेळी केली. यामध्ये 2 षटकार आणि 6 चौकारांचा समावेश आहे.
याबरोबरच या दोघांनीही मायदेशात वनडे क्रिकेटमध्ये 4000 धावा पूर्ण करण्याचा टप्पा पार केला आहे. न्यूझीलंडकडून असा पराक्रम केवळ या दोघांनाच करता आला आहे. टेलरच्या आता न्यूझीलंडमध्ये 105 वनडे सामन्यातील 97 डावात 4059 धावा झाल्या आहेत. तर गप्टिलच्या 95 वनडे सामन्यातील 92 डावात 4021 धावा झाल्या आहेत.
याबरोबर गप्टिलने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या एका विक्रमाशी बरोबरी केली आहे. सचिननेही मायदेशात 92 वनडे डावात आपल्या 4000 धावा पूर्ण केल्या होत्या. त्यामुळे आता मायदेशात सर्वात जलद 4000 धावा पूर्ण करण्याच्या यादीत सचिन आणि गप्टिल संयुक्तरित्या दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
या यादीत अव्वल क्रमांकावर भारताचा कर्णधार विराट कोहली आहे. त्याने भारतात खेळताना 78 वनडे डावात 4000 धावांचा टप्पा पार केला होता.
#मायदेशात खेळताना वनडेत सर्वाधिक धावा करणारे फंलदाज
6976 – सचिन तेंडुलकर
5406 – रिकी पाँटिंग
5178 – जॅक कॅलिस
4865 – विराट कोहली
4724 – कुमार संगाकारा
4351 – एमएस धोनी
4212 – ख्रिस गेल
4070 – तिलकरत्नेे दिलशान
4069 – डीन जोनस
4068 – ऍलन बॉर्डर
4059 – रॉस टेलर
4046 – माहेला जयवर्धने
4021 – मार्टिन गप्टील
#मायदेशात खेळताना वनडेत सर्वात जलद 4000 धावा करणारे फलंदाज –
78 डाव – विराट कोहली
92 डाव – सचिन तेंडुलकर
92 डाव – मार्टिन गप्टिल
२०१९ विश्वचषकानंतरचा टीम इंडियाचा विजयी रथ न्यूझीलंडने रोखला
वाचा👉https://t.co/zpCgyrG7Ok👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #INDvsNZ— Maha Sports (@Maha_Sports) February 8, 2020
विराट कोहलीच्या १२ वर्षांच्या वनडे कारकिर्दीत पहिल्यांदाच घडली ही नकोशी गोष्ट
वाचा👉https://t.co/fTdER82YMO👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #INDvsNZ— Maha Sports (@Maha_Sports) February 8, 2020