---Advertisement---

…आणि सचिन तेंडुलकर ऑस्ट्रेलियाची जर्सी घालून उतरला फलंदाजीला, पहा व्हिडिओ

---Advertisement---

मागील काही महिन्यांपूर्वी ऑस्ट्रेलियामधील जंगलामध्ये आग (Australia Fire) लागली होती. यामध्ये 50 कोटींची जीवितहानी झाली होती. त्यामुळे या आगीत नुकसान झालेल्यांच्या मदतीसाठी आज (9 फेब्रुवारी) मेलबर्नमध्ये चॅरिटी क्रिकेट (Charity Cricket) सामन्याचे आयोजन करण्यात आले होते.

मेलबर्न येथे पाँटिंग एकादश विरुद्ध गिलख्रिस्ट एकादश या संघात सामना पार पडला. हा सामना पाँटिंग एकादशने 1 धावेने (Won By 1 Run) जिंकला. यावेळी सामन्यादरम्यानच्या ब्रेकमध्ये 100 आंतरराष्ट्रीय शतके करणारा भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) क्रिकेट खेळताना दिसला.

सचिनने ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटू एलिसी पेरीच्या (Ellyse Perry) गोलंदाजीचा सामना करताना दिसला.

झाले असे की, शनिवारी (8 फेब्रुवारी) पेरीने ट्विटरवरून सचिनला तिच्या 1 षटक गोलंदाजीवर फलंदाजी करण्याचे आव्हान दिले होते. ते सचिनने स्विकारले. जेव्हा सचिन फलंदाजीला आला तेव्हा पुन्हा एकदा मैदानावर ‘सचिन-सचिन’ नावाचा गजर सुरु झाला.

यानंतर सोशल मीडियावर सचिन ट्रेंड होऊ लागला आणि त्याचा या दरम्यानचा एक व्हिडिओ आयसीसीने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला. 

ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाच्या ट्विटर अकाऊंटवरून पेरी म्हणाली होती की, “हाय सचिन, बुशफायर सामन्यासाठी तुम्हाला येथे पाहून आम्हाला खूप आनंद होत आहे. मला माहिती आहे की तुम्ही या सामन्यातील एका संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहात. परंतु काल रात्री आम्ही सहज चर्चा करत असताना एक विचार आला की उद्या तुम्ही ब्रेकदरम्यान माझ्या गोलंदाजीवर 1 षटक फलंदाजी कराल. तुम्ही फलंदाजी करत असताना मला गोलंदाजी करायला खूप आवडेल.”

यावेळी सचिनने ट्वीट शेअर करत लिहिले की, “उत्कृष्ट, मला असे करायला आवडेल. तसेच 1 षटक फलंदाजीही करेल (माझ्या खांद्याच्या दुखापतीमुळे माझ्या डॉक्टरांच्या सल्ल्याच्या विरूद्ध).”

या चॅरीटी सामन्यात सचिन पाँटिंग एकादश संघाचा प्रशिक्षक आहे. सचिनने यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर नोव्हेंबर 2015मध्ये ऑल स्टार्स सिरीजमध्ये ब्लास्टर्स संघाकडून टी20 सामन्यात खेळला होता. यामध्ये त्याने 56 धावा केल्या होत्या.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---