आयपीएल 2025 (IPL 2025) नंतर आता सर्व फ्रेंचायझींच्या ब्रँड व्हॅल्यू समोर आल्या आहेत. यामध्ये काही संघांना तोटाही पत्करावा लागला आहे. या हंगामाच्या आधी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai super kings) या दोन संघ टॉप 2 मध्ये होते. मात्र आता यात मोठा बदल झाला आहे. या नव्या यादीत दोन संघांनी सगळ्यांना प्रचंड आश्चर्यचकित केले आहे. तरीदेखील टॉप 3 ची शर्यत अत्यंत रोमांचक झाली आहे. IPL 2025 चे विजेतेपद पटकावलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (Royal Challengers Bangaluru) संघ सध्या या क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे.
आरसीबीला (RCB) ट्रॉफी जिंकल्याचा मोठा फायदा मिळाला. विजेते रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची ब्रँड व्हॅल्यू आता तब्बल 269 मिलियनपर्यंत पोहोचली आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या मुंबई इंडियन्स संघाची व्हॅल्यू आता 242 मिलियनवर गेली आहे. अठराव्या हंगामामध्ये अत्यंत निराशाजनक कामगिरी करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सची टीम आता 235 मिलियन ब्रँड व्हॅल्यूसह तिसऱ्या स्थानावर आहे. शर्यतीत नवव्या क्रमांकावर या हंगामाचा उपविजेता संघ पंजाब किंग्स (Punjab kings) आहे, ज्याची ब्रँड व्हॅल्यू केवळ 141 मिलियन इतकी आहे.