---Advertisement---

फिफाने अखिल भारतीय फुटबॉल महासंघाला केले निलंबित, जाणून घ्या कारण

---Advertisement---

फुटबॉलची सर्वोच्च संस्था फिफा (FIFA) ने भारताकडून अंडर १७ महिला विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद काढून घेतले आहे आणि अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (AIFF) ला तात्काळ निलंबित केले आहे. कोर्टाने अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे नियामक मंडळ बरखास्त केल्यामुळे फिफाने हा निर्णय घेतला आहे. नवीन नियामक मंडळाची नियुक्ती होताच हे निलंबन मागे घेतले जाईल. अंडर-१७ महिला विश्वचषक स्पर्धेचे आयोजन ११-३० ऑक्टोबरदरम्यान होणार होते. 

फिफाने अखिल भारतीय फुटबॉल महासंघाला निलंबित केल्यानंतर फिफाने त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाला तत्काळ प्रभावाने निलंबित करण्याचा निर्णय परिषदेतील सर्व सदस्यांच्या संमतीने घेतला गेलेला निर्णय आहे. कारण या निर्णयात तिसर्‍या पक्षाचा खूप हस्तक्षेप होता, जो फिफाच्या नियमांच्या आणि त्याच्या दर्जाच्या विरुद्ध होता.” सध्या सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेली प्रशासकांची समिती (CoA) अखिल भारतीय फुटबॉल महासंघात हस्तक्षेप करत आहे.

तसेच फिफाने असेही सांगितले आहे की, अखिल भारतीय फुटबॉल परिषदेवरील निलंबन तेव्हाट हटेल, जेव्हा ते एकजुट होऊन काम करायला सुरू करतील. फिफानुसार, अखिल भारतीय फुटबॉल महासंघावरील निलंबन आता तेव्हाच उठवले जाईल जेव्हा त्याचे सर्व अधिकारी पूर्णपणे सत्तेवर असतील आणि त्यामधील दैनंदिन कामकाजावर लक्ष ठेवतील.

दरम्यान अखिल भारतीय फुटबॉल महासंघ निलंबित झाल्याने अंडर १७ महिला विश्वचषकाचे यजमानपद त्यांच्या हातून निसटले आहे. तसेच याचा परिणाम इतर स्पर्धांवरही होईल, ज्यामध्ये भारत सहभागी होऊ शकणार नाही. याशिवाय भारताच्या ISL या फुटबॉल लीगमध्ये कोणता परदेशी खेळाडूही खेळू शकणार नाही.

महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---