कतार येथे सुरू असलेल्या फिफा विश्वचषकात उपांत्यपूर्व फेरीचे सामने पूर्ण झाले आहेत. अर्जेंटिना, क्रोएशिया, मोरोक्को व फ्रान्स या संघांनी उपांत्य फेरी धडक मारलीये. उपांत्य फेरीच्या सामन्यांआधी प्रसिद्ध फुटबॉलपटू व अर्जेंटिना संघाचा कर्णधार लिओनेल मेस्सी हा संकटात सापडला आहे. उपांत्यपूर्व फेरीत केलेल्या शिस्तभंगामूळे त्याला आता उपांत्य फेरीच्या सामन्यातून बाहेर व्हावे लागू शकते.
अर्जेंटिनाने शुक्रवारी पेनल्टी शूटआऊटमध्ये नेदरलँड्सचा 4-3 असा पराभव करून विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत स्थान निश्चित केलेले. आता उपांत्य फेरीत त्यांना क्रोएशियाचा सामना करावा लागणार आहे. मात्र, या सामन्यात मेस्सीच्या सहभागाविषयी अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.
नेदरलँड विरुद्ध अर्जेंटिना या उपांत्यपूर्व फेरीचा सामन्यात काही मिनिटात मोठे वाद निर्माण झालेले. त्यावेळी अर्जेंटिना संघाचे मॅनेजर व राखीव खेळाडू मैदानावर उतरलेले. संघाने हा सामना जिंकला असला तरी, त्यांच्या एकूण पाच खेळाडूंना पिवळे कार्ड दाखवण्यात आलेले. सामन्यात इतके पिवळे कार्ड मिळाल्यास संघाच्या कर्णधाराला पुढील सामन्यातून बाद करण्याचा नियम आहे. अर्जेंटिना संघावर ही कारवाई झाल्यास त्यांना मेस्सीविना उपांत्य सामना खेळावा लागेल.
मेस्सी बाहेर झाल्यास याचा संघाला मोठा तोटा सहन करावा लागू शकतो. कारण तो संघाचा प्रमुख स्ट्रायकर आहे. या सामन्यात अर्जेंटिना संघ पराभूत झाल्यास मेस्सीच्या 20 वर्षाच्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल कारकिर्दीची अखेर होऊ शकते. तो संघात असताना अर्जेंटिना एकदाही फुटबॉल विश्वचषक जिंकू शकला नाही. दुसरीकडे, हा सामना जिंकून सलग दुसऱ्यांदा विश्वाच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचा क्रोएशिया संघाचा मानस असेल.
(FIFA Thinking About Ban On Messi For World Cup Semi Final )
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
उनादकतच्या पुनरागमनानंतर पाच वर्षापासून बाहेर असलेला फलंदाज मागतोय संधी; ट्विट करत लिहिले, ‘प्रिय क्रिकेट…’
द्विशतक ईशानचं, पण लक्ष वेधतोय विराटचा भांगडा; व्हिडिओ पाहून तुमचेही थिरकतील पाय