आगामी होणाऱ्या फिफा अंडर-१७ वुमन्स वर्ल्ड कप इंडिया -२०२२ स्पर्धेच्या यजमान शहराच्या लोगोचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन व प्रकल्प संचालक नंदिनी अरोरा आदी मान्यवर उपस्थित होते.
भारतात महिलांची प्रथमच फिफा अंडर-१७ वुमन्स वर्ल्ड कप इंडिया -२०२२ स्पर्धा 11ते 30 ऑक्टोबर या कालावधीत ओडिशा, गोवा आणि नवी मुंबई या ठिकाणी होणार असून नवी मुंबई येथील डीवाय पाटील स्टेडियमवर तिसर्या स्थानासाठीचा व अंतिम सामना खेळला जाणार आहे.
लोगोच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले की, “फिफा अंडर-१७ वुमन्स वर्ल्ड कप इंडिया -२०२२ स्पर्धा यजमान नवी मुंबई शहराच्या लोगोचे अनावरण करताना मला आनंद होत आहे. या स्पर्धेचे डीवाय पाटील स्टेडियमवर विलक्षण सामने पाहायला मिळणार आहेत. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत १६ देशांतील गुणवान खेळाडू पाहायला मिळणार असून ही एक महत्त्वाची स्पर्धा आहे. सर्व सहभागी संघ, खेळाडू आणि कर्मचारी यांना मी शुभेच्छा देऊ इच्छितो.”
भारताने आयोजित केलेल्या पहिल्यावहिल्या फिफा अंडर-१७ वुमन्स वर्ल्ड कप इंडिया -२०२२ स्पर्धेसह देशात वर्षभर विविध मोठ्या तिकीट असणाऱ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. याशिवाय भारतात दोन फिफा स्पर्धा आयोजित करणारे गोवा, महाराष्ट्र हे भारतातील दोन राज्ये आहेत. ऑक्टोबर २०२२ हा महिना युवा खेळाडूंसाठी उत्साहाचा महिना असून १६ देशातील खेळाडू भारतात होणाऱ्या स्पर्धेत विजेतेपदासाठी झुंजणार आहेत.
गिरीश महाजन या वेळी म्हणाले की, “महाराष्ट्राने नेहमीच मोठ्या क्रीडास्पर्धांसाठी सर्वतोपरी सहकार्य केले आहे. या वेळी 16 देशांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेसाठी आम्ही सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. नवी मुंबईत उपान्त्यपूर्व व अंतिम सामना होणार असल्याने फिफा दर्जाच्या स्पर्धेच्या विजेतेपदाची लढत पाहण्याचे भाग्य महाराष्ट्रातील क्रीडाप्रेमींंना मिळणार आहे. नवी मुंबईमध्ये चुरशीच्या अशा दोन उपांत्यपूर्व लढतींसह अंतिम सामनादेखील पाहण्यास मिळणार आहे. महाराष्ट्राच्या धर्तीवर प्रथमच फिफा विजेतेपदाची ऐतिहासिक लढत पाहण्याचे भाग्य क्रीडा प्रेमींना मिळणार आहे.”
महाराष्ट्राने दिल्या सहकार्याबद्दल प्रकल्प संचालक नंदिनी अरोरा यांनी मुख्यमंत्री व क्रीडामंत्र्यांना धन्यवाद दिले. या स्पर्धेची तिकिटे ifa.com/tickets या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
INDvsAUS: हैद्राबादमध्ये तिकीटांसाठी चाहत्यांच्या लांबच लांब रांगा; पोलिसांचा लाठीचार्ज, जखमींचा आकडा…
ठाकुर, कुलदीपने गाजवले मैदान! वनडेत कॅप्टन संजूच्या टीम इंडियाने न्यूझीलंडला रोखले 200च्या आत
“अन् ‘त्या’ सल्ल्यामुळे धोनीला दिले कर्णधारपद”, शरद पवारांचा जुन्या आठवणींना उजाळा