कतार येथे शनिवारी (17 डिसेंबर) फिफा विश्वचषक (FIFA World Cup) 2022च्या तिसऱ्या स्थानासाठी क्रोएशिया आणि मोरोक्को यांच्यात सामना खेळला गेला. ज्यामध्ये क्रोएशियाने वरचढ खेळ करत मोरोक्कोला 2-1 असे पराभूत केले. क्रोएशिया मागील विश्वचषकाच्या हंगामात उपविजेता ठरली होती. या स्पर्धेत त्यांनी साखळी फेरीत मोरोक्को, बेल्जियम, ब्राझील, कॅनडा, जपान यांचा पराभव करत उपांत्य फेरी गाठली होती, मात्र त्यांना अंतिम फेरीत जाण्यापासून अर्जेंटिनाने रोखेले. अर्जेंटिनाने उपांत्य फेरीत त्यांचा 3-0 असा पराभव केला.
त्याचबरोबर मोरोक्कोचा संघ विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचणारा पहिला आफ्रिकी संघ ठरला होता. त्यांना उपांत्य फेरीत फ्रांसने पराभूत केले. आता त्यांना तिसऱ्या स्थानासाठीही क्रोएशियाकडून पराभूत व्हावे लागले. यामुळे ते या स्पर्धेशेवटी चौथ्या स्थानावर राहिले.
या सामन्याच्या पहिल्या सत्रात मागील हंगामाचा उपविजेता क्रोएशिया आक्रमक दिसला. त्यांनी पहिल्या सत्रातच दोन गोल करत आघाडी घेतली, दुसरीकडे मोरोक्कोने देखील सामन्याच्या 9व्या मिनिटाला गोल केला. हा गोल अच्रफ दारी यामुळे पहिले सत्र 2-1 असे राहिले. क्रोएशियाकडून जोस्को ग्वार्डिओल (7व्या मिनिटाला) आणि मिस्लाव ओसिक (42व्या मिनिटाला) यांनी गोल केले.
पहिल्या सत्रात क्रोएशियाने 8 वेळा गोल करण्याचा प्रयत्न केला, ज्यातील 4 शॉट्स टारगेटवर लागले आणि दोन गोल झाले. मोरोक्कोने 4 वेळा गोल करण्याचा प्रयत्न केला. त्यातील एकच शॉट टारगेटवर लागला. या सामन्यात क्रोएशियाने मोरोक्कोची बचावफळी पूर्णपणे उधवस्त केली. त्यामुळे सामना शेवटपर्यंत 2-1 असाच राहिला.
Croatia take the #FIFAWorldCup 3rd spot! 🇭🇷🥉@adidasfootball | #Qatar2022
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) December 17, 2022
क्रोएशिया आणि मोरोक्को यांच्यात या सामन्याआधीही दोन सामने झाले होते, जे बरोबरीत सुटले होते. फिफा क्रमवारीत क्रोएशिया 12व्या आणि मोरोक्को 22व्या स्थानावर आहे.
1998 🥉 2018 🥈 2022 🥉
Croatia 🇭🇷 adds another medal to their collection!
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) December 17, 2022
क्रोएशिया आणि मोरोक्को संघ अंतिम फेरीत पोहोचले नसले तरी त्यांना बक्षीस म्हणून मोठी रक्कम मिळाली आहे. तिसऱ्या स्थानावर राहिल्याने क्रोएशियाला 223 कोटी रुपये आणि चौथ्या स्थानावरील मोरोक्कोला 206 कोटी रुपये मिळाले आहेत. FIFA WC 2022: Aggressive Croatia beat Morocco in thrilling third-place match
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एफसी गोवाचा वर्चस्वपूर्ण विजय, नॉर्थ ईस्ट युनायटेडचा सलग दहावा पराभव
तब्बल 505 मिनिटे फलंदाजी अन् 99 धावांवर बाद, वाचा गावसकरांच्या ‘हिरो’च्या खेळीबद्दल सविस्तर