रविवारी (१५ जुलै) फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात फ्रान्सने क्रोएशियाला ४-२ अशा गोल फरकाने पराभूत करत दुसऱ्यांदा फिफा विश्वचषक आपल्या नावे केला.
फिफा विश्वचषकात सर्वोतम कामगिरी करणाऱ्या फुटबॉलपटूला दिला जाणारा गोल्डन बॉल पुरस्कार क्रोएशिाचा कर्णधार आणि रियल मॅद्रिदचा मिडफिल्डर लुका मॉड्रीकने पटकावला.
लुका मॉड्रीनकने यामध्ये फ्रान्सचा किलियन एम्बापे, अॅन्टोनी ग्रीझमॅन, बेल्जियमचा केवव्हीन डी ब्रुइन आणि इडेन हझार्ड यासारख्या तगड्या फुटबॉलपटूंना मात दिली.
क्रोएशियाचा कर्णधार असलेल्याल्या लुका मॉड्रीकने आपल्या संघाला प्रथमच विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहचवले. तसेच मॉड्रीकने ७ सामन्यात दोन गोल नोंदविले आहेत.
तसेच १९९४ नंतर प्रथमच फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पराभूत होणाऱ्या संघाच्या खेळाडूला गोल्डन बॉलचा पुरस्कार मिळाला आहे. १९९४ मध्ये ब्राझीलच्या रोमारिओने हा पराक्रम केला होता.
adidas Golden Ball Award:
🥇Luka MODRIC (#CRO)
🥈Eden HAZARD (#BEL)
🥉Antoine GRIEZMANN (#FRA) #WorldCup pic.twitter.com/KQSRiwUznh— FIFA World Cup (@FIFAWorldCup) July 15, 2018
फिफा विश्वचषकात प्रथमच अंतिम फेरी गाठणाऱ्या क्रोएशियाला जरी पराभव स्विकारावा लागला असला तरी त्यांच्या स्पर्धेतील अविश्वसनीय कामगिरीने क्रोएशियाने जगभरातून वाहवा मिळवली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-एक फूटबाॅलर ते विश्व विजेती- जाणुन घ्या हिमा दासचा थक्क करणारा प्रवास
-फिफा विश्वचषक: रशियातील फिफा विश्वचषक ‘डोपिंग फ्री’