येत्या आठ दिवसांवर येऊन ठेपलेला फिफा विश्वचषक 2018 ची बक्षिसाची रक्कम 400 मिलीयन डॉलर एवढी प्रचंड आहे. 2014च्या विश्वचषकात हीच रक्कम 358 मिलीयन अमेरिकन डॉलर होती.
रशियात होत असलेल्या या विश्वचषक स्पर्धेला 14 जूनपासून सुरूवात होणार आहे. 32 संघाचा सहभाग असलेल्या या स्पर्धेची ही बक्षिसाची रक्कम वेगवेगळ्या विभागातून दिली जाणार आहे.
या बक्षिस रक्कमेचे विभाजन खालीलप्रमाणे होणार आहे,
ग्रुुप स्टेजमधून बाहेर पडलेल्या 16 संघाना प्रत्येकी 8 मिलीयन अमेरिकन डॉलर
16 संघांच्या फेरीतुन बाद झालेल्या 8 संघाना प्रत्येकी 12 मिलीयन अमेरिकन डॉलर
क्वार्टर फायनलमधून बाहेर पडलेल्या 4 संघाना 16 मिलीयन अमेरिकन डॉलर
चौथ्या स्थानावरील संघाला 22 मिलीयन अमेरिकन डॉलर
तिसऱ्या स्थानावरील संघाला 24 मिलीयन अमेरिकन डॉलर
उपविजेत्या संघाला 28 मिलीयन अमेरिकन डॉलर
विजेत्या संघाला 38 मिलीयन अमेरिकन डॉलर
या बक्षिसाच्या रक्कमबरोबर सगळ्या 32 संघांना विश्वचषक तयारी करण्यासाठी अतिरीक्त प्रत्येकी 1.5 मिलीयन अमेरिकन डॉलर मिळणार आहेत.
तर ज्या क्लबने त्याच्या खेळाडूंना या स्पर्धेत सहभागी होण्याची परवानगी दिली त्या क्लबला अधिकचे 209 मिलीयन अमेरिकन डॉलर मिळणार आहेत.
तसेच त्या क्लब्सचे जर खेळाडूंना या स्पर्धेत खेळताना दूखापत झाली तर त्यांना 134 मिलीयन अमेरिकन डॉलर मिळणार आहेत. ही रक्कम फिफाच्या संरक्षण कायद्यानुसार देण्यात येणार आहे.
यामुळे या वर्षीची एकूण रक्कम 791 मिलीयन अमेरिकन डॉलर एवढी झाली आहे. ही रक्कम मागील फिफा विश्वचषक स्पर्धेपेक्षा 40 पटीने जास्त आहे.