भारतासारख्या देशात जिथे क्रिकेटसारख्या लोकप्रिय खेळामुळे फुटबॉलसहित अन्य खेळांनाही चाहत्यांचा वनवा आहे.
मात्र आसाममध्ये असा एक फुटबॉलवेडा चाहता आहे, ज्याने फुटबॉल विश्वचषकानिमित्त 15 लाखांचे कर्ज काढून फुटबॉल रसिकांना एक अनोखी भेट दिली आहे.
आसाममधील काब्री अॅन्गलॉग जिल्ह्यातील दिफू गावच्या 53 वर्षीय पुतल बोराह यांनी 15 लाखांचे कर्ज काढून आपल्या घरासमोर 1,800 चौरच मिटरचे ऑडीटोरीयम बांधले. ज्यामध्ये एकावेळी पाचशे पेक्षा जास्त प्रेक्षक बसून फिफा विश्वचषकाचा आनंद घेऊ शकतात.
गुरूवार दि. 14 जूनला गिल्बर्टसन संगमा या भारतीय फुटबॉलपटूच्या हस्ते या ऑडीटोरीयमचे उद्धाटन पार पडले.
“मी फुटबॉलचा निस्सीम चाहता आहे. माझ्या गावातील फुटबॉल चाहत्यांची फिफा विश्वचषक पाहण्याची सोय व्हावी म्हणून मी हे ऑडीटोरीयम बांधले आहे. मी 1990 पासून माझ्या गावातील चाहत्यांसाठी विश्वचषक पाहण्याची सोय करतोय. पण यावेळी जास्तीत जास्त प्रेक्षकांना विश्वचषक पाहता यावा यासाठी मी 15 लाखांचे कर्ज घेउन हे ऑडीटोरीयम बांधले.” पत्रकारांशी बोलताना पुतल बोराह म्हणाले.
Germany fan from Assam takes loan, builds auditorium. Putul Borah, a 57-year-old from Diphu town in Assam, who has built an auditorium with a bank loan of 13 lakh to screen matches for football enthusiasts. The die-hard fan of Germany has named the auditorium, The German Stadium. pic.twitter.com/dpELaF38Xn
— Nandan Pratim Sharma Bordoloi (@NANDANPRATIM) June 15, 2018
पुतल बोराह हे जर्मनी संघाचे चाहते असल्यामुळे त्यांनी याला ‘जर्मन स्टेडीयम’ असे नाव दिले आहे. 56 इंची एलसीडी मॉनिटरद्वारा येथे विश्वचषकातील सर्व सामन्यांचे प्रेक्षपण होणार आहे.
2018 फिफा विश्वचषकात सहभागी झालेल्या सर्व 32 संघाचे धव्ज या ऑडीटोरीयम वर लावण्यात आले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
– फिफा विश्वचषकासारख्या महत्त्वाच्या स्पर्धेत त्याने चक्क नाकारली ‘मॅन आॅफ द मॅच’
–36 वर्षांनंतर पेरू खेळणार फिफा विश्वचषकात