टी20 क्रिकेट प्रकारातील सर्वात महत्त्वाची स्पर्धा म्हणजे टी20 विश्वचषक होय. नुकताच टी20 विश्वचषक 2022चा महाकुंभमेळा ऑस्ट्रेलियात पार पडला. या स्पर्धेला इंग्लंडच्या रुपात विजेता मिळाला. या स्पर्धेनंतर आता क्रीडा चाहत्यांना फीफा विश्वचषक 2022चे वेध लागले आहे. खरं तर, ही स्पर्धा 20 नोव्हेंबर, 2022पासून सुरू होणार आहे. यावेळी या स्पर्धेचे यजमानपद कतारकडे आहे. विशेष म्हणजे, पहिल्यांदाचा फीफा विश्वचषकात अनेक आखाती देशही सहभागी होणार आहेत.
एकूण 32 देश घेणार भाग
फीफा विश्वचषक 2022 (Fifa World Cup 2022) स्पर्धेत एकूण 32 संघ भाग घेत आहेत. यामध्ये आशियातून 6 संघ आहेत. नुकत्याच पार पडलेल्या टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेतील विजेत्या आणि उपविजेत्या संघांसोबतच इतर संघांनाही बक्षीस रक्कम देण्यात आली होती. आता फीफा विश्वचषकात बक्षीस रक्कम (Fifa World Cup Prize Money) आणि ट्रॉफी जिंकण्यासाठी सर्व संघ आपापसांत भिडतील.
The #FIFAWorldCup party is about to get started! 🙌
🏟️ 🇶🇦 17:30 local time. It's going to be big. pic.twitter.com/Uj65drRkWV
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) November 19, 2022
टी20 विश्वचषकाच्या तुलनेत फीफा विश्वचषक विजेत्या संघाला 26 पट जास्त रक्कम
फीफा विश्वचषकाच्या चाहत्यांच्या मनातही असाच प्रश्न उपस्थित होत असेल की, फीफा विश्वचषक 2022मध्ये किताब जिंकणाऱ्या संघाला किती बक्षीस रक्कम दिली जाते? तसेच, टी20 विश्वचषक 2022 जिंकणाऱ्या संघाला किती बक्षीस रक्कम मिळाली. माध्यमांतील वृत्तांनुसार, फीफा आणि टी20 विश्वचषक विजेत्या संघांना मिळणाऱ्या रक्कमेत जवळपास 26 पट फरक आहे. म्हणजेच, टी20 विश्वचषक विजेत्या संघाला जी रक्कम मिळते, त्यापेक्षा 26 पट जास्त रक्कम फीफा विश्वचषक विजेत्या संघाला मिळते.
यावेळी फीफा विश्वचषकाचे यजमानपद कतार देश करत आहे. यासाठी त्यांनी बक्षीस रक्कमेचीही घोषणा केली आहे. यावेळी संपूर्ण विश्वचषकात वाटली जाणारी बक्षीस रक्कम 440 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 3585 कोटी रुपये असेल. यामध्ये विश्वचषक विजेत्या संघाला 42 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 342 कोटी रुपये (Fifa World Cup Winner Prize Money) मिळतील. (fifa world cup 2022 football world cup winners prize money is 26 times more than cricket)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
फुटबॉल नको रे बाबा! हा भारतीय क्रिकेटपटू फुटबॉलला पायही लावत नाही
‘तू जो मिला…’, टीम इंडियाच्या ‘गब्बर’ची मुलगा झोरावरसोबत जोरदार मस्ती, व्हिडिओ भन्नाट व्हायरल