कतारमध्ये खेळल्या जाणाऱ्या फिफा विश्वचषक (FIFA World Cup) 2022चा दुसरा अंतिम संघ निश्चित झाला आहे. बुधवारी (14 डिसेंबर) उशिरा रात्री झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात फ्रांसने धमाकेदार प्रदर्शन केले. गतविजेत्या फ्रांसने या स्पर्धेत बलाढ्या संघांना धक्के देणारा मोरोक्को स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्यांना फ्रांसविरुद्धच्या उपांत्या सामन्यात 2-0ने पराभूत व्हावे लागले. यामुळे फ्रांस आता अंतिम सामन्यात लियोनल मेस्सीच्या अर्जेंटिनाशी भिडणार आहे.
मोरोक्कोने हा सामना जिंकला असता तर ते फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात खेळणारा पहिला आफ्रिकी संघ ठरला असता. दुसरीकडे फ्रांसला सलग दुसऱ्यांदा विश्वविजेता बनण्याची संधी आहे. त्यांनी 2018मध्ये खेळल्या गेलेल्या फिफा विश्वचषकाच्या सामन्यात क्रोएशियाचा पराभव करत दुसऱ्यांदा चॅम्पियन होण्याचा मान मिळवला होता.
मोरोक्को विरुद्ध फ्रांसने नेहमीप्रमाणे उत्तम खेळ केला. सामन्याच्या 5व्या मिनिटाला थियो हर्नांडेझ याने गोल केला आणि फ्रांसने आघाडी घेतली. रांदल कोलो मुआनी (Randal KOLO MUANI) याने 79व्या मिनिटाला मैदानात प्रवेश केला आणि अवघ्या 44 सेंकदातच त्याने गोल करत संघाला 2-0 अशी मजबूत आघाडी मिळवून दिली. त्याचबरोबर तो विश्वचषकात सर्वात जलद गोल करणारा केवळ दुसराच सब्सस्टिट्यूट ठरला. तसेच मुआनीचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय गोल होता.
France are through to the final! 👊@adidasfootball | #FIFAWorldCup
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) December 14, 2022
या सामन्याच्या पहिल्या सत्रात फ्रांसने नऊ वेळा गोल करण्याचा प्रयत्न केला. ज्यामध्ये दोन वेळा टारगेटवर शॉट केले आणि एक गोल झाला. दुसऱ्या सत्रात मोरोक्कोने काहीसा आक्रमक खेळ केला, मात्र त्यांना फायदा उचलता आला नाही. त्यांनीही पाच वेळा गोल करण्याचा प्रयत्न केला. ज्यामध्ये दोन वेळा टारगेटवर शॉट केले मात्र फ्रांसचा कर्णधार आणि गोलकिपर लॉरिसने त्याचा उत्तमरित्या बचाव केला.
फ्रांसने हा सामना जिंकत चौथ्यांदा फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. याआधी त्यांनी तीनदा अंतिम सामना खेळताना 1998 आणि 2018मध्ये विजेतेपदावर नाव कोरले. तसेच 2006मध्ये ते उपविजेते ठरले होते. त्याचबरोबर फ्रांस दोनवेळा तिसऱ्या आणि एकदा चौथ्या स्थानावर राहिला आहे. यामुळे ते एकूण सात वेळा पहिल्या चार क्रमांकामध्ये राहिले आहेत.
फ्रांस आणि अर्जेंटिना यांच्यातील अंतिम सामना 18 डिसेंबरला लुसेल स्टेडियमवर खेळला जाणार आहे. FIFA World Cup 2022: France beat Morocco in semi and enter second consecutive final
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! केन विल्यमसन न्यूझीलंडच्या कसोटी कर्णधारपदावरून पायउतार, ‘हा’ दिग्गज बनला कॅप्टन
घरच्या मैदानावर ओडिशा एफसी विजयी मार्गावर परतण्यास उत्सुक, एटीके मोहन बागानचे आव्हान