फीफा विश्वचषक 2022 ही फुटबॉल स्पर्धा कतार येथे खेळली जात आहे. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठीचे दोन संघ समोर आले आहेत. फीफा विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (दि. 18 डिसेंबर) लिओनल मेस्सी याच्या नेतृत्वातील अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स संघांमध्ये खेळला जाणार आहे. उभय संघातील हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार 8.30 वाजता खेळला जाईल. अशात या सामन्यानंतर विजेत्या संघाला प्राईज मनी म्हणजेच बक्षीस रक्कम म्हणून किती रुपये मिळतील? असा प्रश्नही फुटबॉल प्रेमींच्या मनात आला असेल. चला तर सविस्तर जाणून घेऊया…
विजेत्या संघाला किती रुपये मिळतील?
नेहमीप्रमाणे यावेळीही फीफा विश्वचषक 2022 (Fifa World Cup 2022) विजेत्या आणि उपविजेत्यासह तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या संघांवरही कोट्यवधी रुपयांचा वर्षाव होणार आहे. या संघांना मिळणारी रक्कम जाणून चाहतेही हैराण होतील. ही रक्कम क्रिकेट विश्वचषक (Cricket World Cup) आणि इंडियन प्रीमिअर लीग (Indian Premier League) या स्पर्धांच्या बक्षीस रकमेच्या तुलनेत कितीतरी पटींनी जास्त असते.
यावेळी संपूर्ण फीफा विश्वचषक स्पर्धेसाठी एकूण प्राईज मनी ही 440 मिलियन डॉलर (जवळपास 3641 कोटी रुपये) इतकी आहे. यामध्ये विश्वचषक विजेत्या संघाला 42 मिलियन म्हणजे जवळपास 347 कोटी रुपये मिळतील. ही रक्कम 2018च्या विश्वचषकाच्या तुलनेत 4 मिलियन डॉलर जास्त आहे. तसेच, उपविजेत्या संघाला 30 मिलियन म्हणजेच जवळपास 248 कोटी रुपये दिले जातील.
इतर संघांनाही मिळतील कोट्यवधी रुपये
विजेत्या आणि उपविजेत्या संघांव्यतिरिक्त तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या संघांवरही कोट्यवधी रुपयांचा वर्षाव होईल. अंतिम सामन्याच्या एक दिवस आधी म्हणजेच 17 डिसेंबर रोजी एक सामना खेळला जाणार आहे. या दोन्ही सामन्यात पराभूत होणाऱ्या क्रोएशिया आणि मोरोक्को संघामध्ये खेळला जाणार आहे. जिंकणाऱ्या संघाचा तिसऱ्या आणि पराभूत होणाऱ्या संघाचा चौथ्या क्रमांकावर प्रवास संपेल. त्यानुसार, त्यांना बक्षीस रक्कमही दिली जाईल.
‘या’ संघांवर पडणार पैशांचा पाऊस
विजेता संघ- 347 कोटी रुपये
उपविजेता संघ- 248 कोटी रुपये
तिसऱ्या क्रमांकावरील संघ- 223 कोटी रुपये
चौथ्या क्रमांकावरील संघ- 206 कोटी
इतर संघांनाही मिळणार बक्षीस
विश्वचषकात सामील झालेल्या प्रत्येक संघाला प्रत्येकी 9 मिलियन डॉलर (जवळपास 73 कोटी रुपये) मिळतील.
उपउपांत्यपूर्व फेरीत पोहोचणाऱ्या संघांना 13 मिलियन डॉलर (जवळपास 96 कोटी रुपये) मिळतील.
उपांत्यपूर्व फेरीत पराभूत होणाऱ्या संघांना 17 मिलियन डॉलर (जवळपास 126 कोटी रुपये) मिळतील.
कुणाला किती रुपये मिळाले?
आयपीएल 2022च्या हंगामात किताब जिंकणाऱ्या संघाला 20 कोटी रुपये मिळाले होते. आयसीसी टी20 विश्वचषक 2022 चा किताब जिंकणाऱ्या संघाला जवळपास 13 कोटी रुपये मिळाले होते. तसेच, आता फीफा विश्वचषक 2022 स्पर्धेचा किताब जिंकणाऱ्या संघाला जवळपास 342 कोटी रुपये मिळतील. (fifa world cup 2022 prize money winner and runner up know all here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
FIFA WC 2022: अर्जेंटिनाशी भिडण्यापूर्वीच फ्रांसला मोठा धक्का, अनेक स्टार खेळाडू व्हायरसच्या विळख्यात
FIFA WC 2022: पोर्तुगलच्या पराभवानंतर एकच गोंधळ, रोनाल्डोला बाकावर बसवणाऱ्या हेड कोचला दिला नारळ