फिफा विश्वचषक (FIFA World Cup) 2022च्या स्पर्धेत शुक्रवारी (2 डिसेंबर) जपानने स्पेनला 2-1 असे पराभूत केले. हा सामना खलिफा इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळला गेला. यातील जपानने केलेला दुसरा गोल चांगलाच वादग्रस्त ठरला. त्या एका गोलमुळे चार वेळेचा विश्वविजेता जर्मनी स्पर्धेबाहेर झाला. तसेच त्याचवेळी जर्मनीचाही सामना कोस्ट रिकाविरुद्ध सुरू होता. जो त्यांनी 4-2 असा फरकाने जिंकला, मात्र ते सुपर 16मध्ये जागा बनवू शकले नाही.
स्पेन जपानविरुद्ध पहिल्या सत्रात आघाडीवर राहिला, मात्र दुसऱ्या सत्रात जपानचे वर्चस्व दिसले. तसेच 51व्या मिनिटाला एओ तनाका (Ao Tanaka) याने केलेला गोल व्हिडिओ असिस्टंट रेफरी (VAR) यांनी नाकारला होता. नंतर खूप वेळ झालेल्या चर्चेने निर्णय घेतला गेला आणि तो गोल होता असा निकाल देण्यात आला. या एका गोलमुळेच जर्मनीवर स्पर्धेबाहेर पडण्याची नामुष्की आली.
झाले असे की, चेंडू मैदानाच्या उजव्या बाजूने खेळला गेला आणि काओरू मितोमा (Kaoru Mitoma) त्याच्या मागे होता. तथापि, जपानच्या खेळाडूने तो रोखण्यापूर्वीच चेंडूने टचलाइन ओलांडली.
“मी एक फोटो पाहिला आहे ज्यामध्ये छेडछाड केली गेली असावी, हा फोटो खरा असू शकत नाही. तसेच रेफरीनेदेखील खूप वेळ घेतला, ” असे स्पेनचे मॅनेजर लुईस एनरिक यांनी नंतर सांगितले.
हा गोल दिला गेला नसता तर जपानचे चार अंक झाले असते आणि जर्मनी कोस्टा रिका विरुद्ध जिंकल्याने ते सहज सुपर 16मध्ये गेले असते, मात्र तसे झाले नाही.
https://twitter.com/Chris78Williams/status/1598410807594852363?s=20&t=L-yJnB0yRXFvyD5Wp19o0A
जपानला तो गोल कसा काय दिला गेला? याबाबत सोशल मीडियावर चाहत्यांनी आपापली मते मांडली आहेत. तसेच सामना सुरू असताना अनेक टिव्ही प्रक्षेपणांनी बॉल प्रत्यक्षात बाहेर होता, असे फोटो दाखवले होते. तथापि, फिफाने अद्याप जाहीर न केलेल्या पर्यायी कोनांमुळे व्हिडिओ रेफरीने निष्कर्ष काढला की संपूर्ण चेंडू प्रत्यक्षात बाहेर गेला नव्हता आणि तो रेषा ओलांडत होता. अधिकारीही त्यांनी योग्य निर्णय घेतला यावर ते ठाम राहिले. असे असले तरीही विश्वचषक स्पर्धेतील हा गोल कायम सर्वांच्या लक्षात राहिल आणि अनेक काळ त्याची चर्चा होत राहिल.
— Gary Neville (@GNev2) December 1, 2022
या गोलमुळे तिसऱ्या स्थानावर असलेला जपान जिंकला आणि त्यांनी अंतिम 16मध्ये प्रवेश केला. त्यांचा पुढील सामना 5 डिसेंबरला क्रोएशिया विरुद्ध आहे. जर्मनीने कोस्टा रिकाला पराभूत केले यामुळे ग्रुप ई च्या गुणतालिकेत स्पेन आणि जर्मनीचे अंक बरोबर झाले, मात्र गोल फरकाने स्पेन गुणातालिकेत दुसऱ्या स्थानावर आला. तनाकाने केलेल्या गोलमुळे तो सामनावीर ठरला.
याबरोबरच स्पेनने अंतिम 16 मध्ये प्रवेश केला. त्यांचा पुढील सामना 6 डिसेंबरला मोरोक्को विरुद्ध आहे. FIFA World Cup: Germany out of the tournament due to ‘that’ controversial goal by Japan’s Ao Tanaka
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! ड्वेन ब्रावोची आयपीएलमधून निवृत्ती, पुढील हंगामासाठी घेतली ‘ही’ मोठी जबाबदारी खांद्यावर
लई चोपलं राव! पाकिस्तानी खेळाडूच्या नावावर नकोसा रेकॉर्ड, संघाचीही मान शरमेने खाली