---Advertisement---

FIFA WORLD CUP: धक्कादायक निकालांची मालिका सुरूच! जपानने जर्मनीला केले चित

On: बुधवार, नोव्हेंबर 23, 2022 11:28 PM
---Advertisement---

कतार येथे सुरू असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषकात बुधवारी पहिला सामना जर्मनी विरुद्ध जपान असा खेळला गेला. अत्यंत अनपेक्षित निकाल लागलेल्या या सामन्यात जपानने 2014 फुटबॉल विश्वचषक जिंकणाऱ्या जर्मनीला 2-1 असे पराभूत केले. अशा रीतीने सलग दुसऱ्या दिवशी चाहत्यांना धक्कादायक निकाल पाहायला मिळाला.

https://twitter.com/FIFAWorldCup/status/1595433057829396481?t=YUDH0DvKXy7EeQAescrkbw&s=19

खलिफा इंटरनॅशनल फुटबॉल स्टेडियम येथे झालेल्या या सामन्यात जर्मनी विजेतेपदाचे प्रबळ दावेदार म्हणून मैदानात उतरले होते. जर्मनीने अपेक्षित अशी आक्रमक सुरुवात करत जपानवर दबाव आणला. त्यांना या खेळाचा फायदा 33 व्या मिनिटाला मिळाला. जपानने केलेल्या चुकीमुळे जर्मनीला पेनल्टी बहाल करण्यात आली. जी एल्चे याने सत्कारणी लावत जर्मनीला आघाडीवर नेले. पहिल्या हाफमध्ये जर्मनी संघाकडे ही आघाडी कायम होती.

दुसऱ्या हाफमध्ये मात्र खेळ अचानक पलटला. कायले हावर्त्सने केलेला गोल ऑफ साईड दिला गेल्याने जर्मनीला आपला दुसरा गोल नोंदवता आला नाही. जपान संघाने देखील आपल्या आक्रमणाची धार वाढवली. अखेरीस 75 व्या मिनिटाला त्यांना बरोबरी करण्यात यश आले. रित्सू डोआनने गोल करत ही बरोबरी साधून दिली. जर्मनीचा संघ या धक्क्यातून सावरण्याआधीच त्यांना दुसरा धक्का देखील मिळाला. 83 व्या मिनिटाला ताकुमा असानो याने जर्मनीचा कर्णधार मॅन्यूएल नेऊरला चकवत जपानला आघाडीवर नेले. त्यानंतर जर्मनीने बरोबर साधण्याचे पूर्ण प्रयत्न केले. मात्र, जपानचा गोलकीपर गोंडा याने त्यांचे सर्व प्रयत्न हाणून पाडत आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशीच विजेतेपदाचे दावेदार असलेल्या अर्जेंटिना संघाला सौदी अरेबियाने पराभूत करत खळबळ माजवली होती.

(FIFA WORLD CUP Japan Upset Germany)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---